किमान तापमान : 27.05° से.
कमाल तापमान : 27.17° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.05° से.
26.87°से. - 30.73°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.83°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.69°से. - 29.54°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.67°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 29.35°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.65°से. - 28.47°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादल-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशावाद,
अमरावती, (१० सप्टेंबर) – उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी हनुमान चालीसा म्हणणार्यांना कारागृहात टाकले होते. मी त्यांना सांगू इच्छितो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तो दिवस दूर नाही, ज्या दिवशी पाकिस्तानात हनुमान चालीसा म्हटला जाईल, असा आशावाद उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केला. बडनेराचे आमदार रवी राणा यांनी रविवारी आयोजित केलेल्या नवाथे चौक येथील दहीहंडी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, किरण पातूरकर, चंद्रकुमार जाजोदीया यांच्यासह सिनेकलाकार शिल्पा शेट्टी, राजपाल यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, उदयनिधी स्टॅलिनने हिंदू धर्माला नष्ट करण्याची भाषा केली आहे. त्याला मी सांगू इच्छितो की, आजवर अनेक येऊन गेले पण त्यांनाही हिंदू धर्म नष्ट करणे जमले नाही. भविष्यातही तसा कोणी पैदा होणार नाही. हिंदू धर्माचा द्वेष करणार्यांना त्यांची जागा निश्चित दाखविल्या जाईल. आपण इंडिया माता नाही, भारत माता म्हणतो असे सांगून त्यांनी भारत नावाचे समर्थन केले. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत असणार्या खा. नवनीत राणा यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी छत्री तलाव येथे श्री हनुमानजी यांची १११ फूट उंचीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. त्या मूर्तीच्या प्रतिकृतीचे रिमोटव्दारे अनावरण करण्यात आले. उपस्थित अन्य मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.