किमान तापमान : 28.99° से.
कमाल तापमान : 29° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 45 %
वायू वेग : 3.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.23°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.73°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.81°से. - 29.63°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.54°से. - 29.57°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.84°से. - 29.35°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.78°से. - 28.96°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल– शरद पवार गटाची निवडणूक आयोगाला माहिती,
मुंबई, (०९ सप्टेंबर) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही. काही जणांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी पक्ष सोडला आहे, असे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राकाँच्या गटाने शनिवारी निवडणूक आयोगाला सांगितले. अजित पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निवडणूक आयोगाने आमच्याकडे उत्तर मागितले होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदनात दिली. पक्षाने ७ सप्टेंबर रोजी आपला प्राथमिक प्रतिसाद आयोगाकडे सादर केला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
अजित पवार वारंवार घेत असलेली विरोधाभासी भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे आणि कोणताही कायदेशीर आधार न घेता त्यांनी निवडणूक आयोगासमोर कशा प्रकारे दावा केला, हे देखील स्पष्ट करण्यात आले असल्याचे शरद पवार गटाने सांगितले. पक्षात कुठलेही मतभेद नाहीत. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी काही जणांनी पक्ष सोडला असल्याचे आम्ही निवडणूक आयोगाला कळवले आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी संघटना अबाधित आणि एकत्रितपणे उभी आहे, असे राकाँने निवडणूक आयोगाला सांगितले. जुलै महिन्यात अजित पवार यांच्या नेतृत्वात राकाँचे आठ आमदार एकनाथ शिदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे पक्षात फूट पडली. अजित पवार यांनी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केला.