किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशपुणे, (१३ जानेवारी) – अयोध्येत २२ जानेवारीला होणार्या रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचं आमंत्रण मिळालेलं नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण २२ जानेवारीला नाहीतर, नंतर नक्की जाणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. इंडी आघाडीच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात जुन्नरमधील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. एवढंच नाहीतर त्यांनी पंतप्रधान मोदींनी नाशिक दौर्यावेळी राजकारणातील घराणेशाहीवर केलेल्या टीकेलाही शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पंतप्रधान मोदी काल नाशिक दौर्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी राजकारणातील घराणेशाहीवर टीका केली होती. यावर शरद पवार म्हणाले की, मोदी म्हणतात की, घराणेशाही आलीये, ती मोडीत काढायला हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय? डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, व्यापार्यांचा मुलगा व्यापारी आणि शेतकर्यांचा मुलगा शेतकरी होतो, मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही झाली? त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाहीबाबत बोलणं योग्य नाही. त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवं.
अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, मला त्याचं आमंत्रण आलेलं नाही. मी म्हटलं काही हरकत नाही, पण मी जाणार. मात्र, २२ जानेवारीला नाही. नंतर, नक्की जाणार. श्रीराम हे सर्वांचे आहेत, असं पवार म्हणाले आहेत. अयोध्येला जाणार्या विमानाच्या तिकिटात वाढ केलेली आहे. दहा हजारांचे तिकीट चाळीस हजार करण्यात आलेत. विमानसेवा अशी महागली आहे, अशावेळी कोणी अयोध्येला गेलं नाहीतर, त्या व्यक्तीला श्रीरामांबद्दल आस्था नाही, असा अर्थ काढणं चुकीचं राहील. राम मंदिराचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही जाणार नाही, अशी भूमिका शंकराचार्य यांनी घेतली आहे. आता मंदिराचं काम पूर्ण व्हायला आणखी दोन वर्षे तरी लागतील, असंही शरद पवार म्हणाले आहेत.