किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनितीश भारद्वाज यांची व्यथा,
मुंबई, १८ जानेवारी – घटस्फोट घेण्यामागे जोडप्यांची कारणे बरीच असू शकतात. मात्र, एक नक्की सांगू शकतो की, घटस्फोट हा कधीकधी मृत्युपेक्षाही जास्त वेदनादायी असू शकतो, अशी व्यथा पत्नीपासून विभक्त झालेले अभिनेता नितीश भारद्वाज यांनी व्यक्त केली.
छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘महाभारत’ या पौराणिक मालिकेत कृष्णाची भूमिका अजरामर करणारे अभिनेता नितीश भारद्वाज लग्नाच्या १२ वर्षांनंतर पत्नी स्मिता गाते यांच्यापासून वेगळे झाले आहेत. स्मिता गाते या सनदी अधिकारी आहेत. दोघांनी सप्टेंबर २०१९ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता नितीश यांनी एका मुलाखतीत घटस्फोटाबाबत सांगितले.
ते म्हणाले, मी सप्टेंबर २०१९ मध्ये मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. आमच्या विभक्त होण्याच्या कारणांबद्दल मी सध्या काही सांगू इच्छित नाही; अद्याप घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. मला एवढेच सांगायचे आहे की, घटस्फोट हा मृत्युपेक्षाही जास्त वेदनादायी असू शकतो. कारण, तुम्ही सगळ्यांपासून वेगळे होता. तुमच्या आत फक्त एकाकीपणा शिल्लक राहतो.
माझा लग्नावर खूप विश्वास आहे, पण या बाबतीत मी दुर्दैवी ठरलो. लग्न मोडण्याची अनेक कारणे असू शकतात. काहीवेळा तुमची बिनधास्त वृत्ती कारणीभूत असू शकते. काहीवेळा अहंकार आणि तडजोड न करण्याची वृत्तीमुळे घटस्फोट होतात. घटस्फोटानंतर सर्वाधिक त्रास मुलांना होता. आपल्यामुळे मुलांना कमीत कमी त्रास होईल, याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
भारद्वाज यांना जुळ्या मुली असून, दोघ्याही आईसोबत इंदूरमध्ये राहतात. नितीश यांचे पहिले लग्न १९९१ मध्ये मोनिषा पाटीलसोबत झाले होते. मात्र, २००५ मध्ये दोघे वेगळे झाले. नंतर २००९ मध्ये त्यांनी स्मिता यांच्याशी लग्न केले.