किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– तामिळ अभिनेता विशालचे सेन्सॉर बोर्डावर गंभीर आरोप,
मुंबई, (३० सप्टेंबर) – सुप्रसिद्ध तामिळ अभिनेता विशालने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या अधिकार्यांवर लाच घेतल्याचा आरोप केला. विशालचा मार्क अँटनी हा चित्रपट १५ सप्टेंबरला प्रदर्शित झाला आहे. हा तामिळ भाषेतील सायन्स फिक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाची हिंदी आवृत्ती पास करण्यासाठी सेन्सॉरच्या अधिकार्यांना ६.५ लाख रुपयांची लाच द्यावी लागल्याचा आरोप त्यांनी केला. गुरुवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करताना अभिनेता म्हणाला की, मंडळाच्या मुंबई कार्यालयात बसलेल्या अधिकार्यांनी त्याचा नवा चित्रपट मार्क अँटनीच्या हिंदी आवृत्तीचे सेन्सॉर प्रमाणपत्र पास करण्यासाठी ६.५ लाख रुपयांची लाच मागितली. या चित्रपटासाठी बरेच काही पणाला लागल्यामुळे त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
रुपेरी पडद्यावर भ्रष्टाचार दाखवणे ठीक आहे, पण खर्या आयुष्यात तो पचवता येत नाही. विशेषत: सरकारी कार्यालयांमध्ये आणि मंडळाच्या मुंबई कार्यालयात याहून वाईट घडत आहे. मार्क अँटनी या माझ्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी मला दोन व्यवहारांमध्ये ६.५ लाख रुपये द्यावे लागले. यापैकी मी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी ३ लाख रुपये आणि प्रमाणपत्रासाठी ३.५ लाख रुपये दिले, असे विशाल म्हणाला.
मी हे माझ्यासाठी नाही तर, इतर निर्मात्यांसाठी करीत आहे. माझ्या कष्टाचा पैसा भ्रष्टाचारात गेला का, अजिबात नाही. मी सर्व पुरावे शेअर करीत आहे. मला आशा आहे की, नेहमीप्रमाणे सत्याचा विजय होईल. व्हिडीओमध्ये विशालने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. सोबतच त्याने ज्या खात्यांमध्ये ३ आणि ३.५ लाख रुपये स्वतंत्रपणे जमा केले, त्यांचा तपशीलही अपलोड केला आहे.