किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका,
रत्नागिरी, (५ मार्च) – मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळला. यांना देशभर फिरून, गुवाहाटीला जाऊन तो सांभाळता येत नाही. यांचा अर्धा वेळ दिल्लीत मुजरा करायला जातो, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर रविवारी केली. शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर पहिल्यांदाच रत्नागिरीतील खेड येथे आयोजित केलेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. ज्यांना शक्य आहे तितके दिले, पण ते आता खोक्यात बंद झाले. आज माझे हात रिकामे आहेत, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. आज मी तुमच्याकडे मागायला आलो. मला तुमची साथ हवी आहे. जे भुरटे चोर, गद्दार आहेत, त्यांना सांगायचे आहे की, तुम्ही शिवसेना हे नाव चोरू शकाल, पण शिवसेना चोरू शकणार नाहीत. जिथे रावण आपटला, तिथे मिंधे गटाचे काय, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.
कानडी मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले आणि हे गप्प बसले. एक काळा टोपीवाला होता, त्याने शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. त्यावेळी हे शेपट्या घालून बसले. ज्यांना खोकी मिळाली नाहीत, मंत्रिपदे मिळाली नाहीत त्यांना सांभाळण्यातही यांचा वेळ जात आहे. सगळे उद्योग गुजरातला जातात, आता कर्नाटकात निवडणूक असल्याने आयफोनचा उद्योग तिकडे गेला. महाराष्ट्राला काहीच द्यायचे नाही, पण तुटलेल्या फुटलेल्या काचांच्या एसटीवर फोटो लावायचे आणि गतिमान महाराष्ट्र अशी जाहिरात करायची, हेच यांचे उद्योग आहेत, अशी टीका ठाकरे यांनी शिंदेंवर केली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला.
निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाही
हा निवडणूक नव्हे, ‘चुना लगाव’ आयोग आहे. ते सत्तेचे गुलाम आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर केली. ते म्हणाले की, वरून काय आदेश येईल, त्याप्रमाणे ते वागणारे आहेत. या निवडणूक आयोगाचे वडील वरती बसले असतील, पण शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केली, हे लक्षात ठेवा. आम्हाला निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.