किमान तापमान : 28.76° से.
कमाल तापमान : 29.58° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 5.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.58° से.
27.43°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशवाहतुकीची प्रचंड कोंडी, नागरिकांची त्रेधातिरपीट,
मुंबई, १८ जुलै – शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा मुंबईला जबरदस्त तडाखा बसला असून, अवघे महानगर जलमय झाले आहे. शहरातील मुख्य तसेच अन्य लहानसहान रस्ते पाण्याखाली गेले असून, अनेक भागात वाहतुकीची कोंडी झाली आहे. भायखळा, सायन, अंधेरी भागात पाणीच पाणी झाले आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे सकाळी कामाला निघालेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत.
मुंबईत रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर अजूनही पाणी आहे. त्यामुळे अनेक भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागत आहे. मुंबईतील सायन, चेंबूर, कुर्ला, चुनाभट्टी, भांडूप, कुर्ला, अंधेरी, मालाड, बोरिवली आणि कांदिवली येथील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
पावसामुळे मुंबईची रक्तवाहिनी समजली जाणारी लोकलसेवाही विस्कळीत झाली आहे. सायन गांधी बाजारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या पाण्याचा निचरा करण्यासाठी मनपा कर्मचार्यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीलाही जोबरदार फटका बसला असून ठाणे-सीएसएमटी दरम्यान रेल्वे सेवा बंद पडली आहे.
दादर, कुर्ला, सायन, परळ, भांडूपमध्ये रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. लांब पल्ल्याच्या गाड्याही खोळंबल्या आहेत. दहिसर नदी पाण्याची पातळी ओलांडून वाहू लागली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या घरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.