किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, १७ जुलै – विदेशातून भारतात आलिशान गाड्यांची तस्करी करणार्या टोळीचा पहिल्यांदाच पर्दाफाश करण्यात आला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ही मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
देशात प्रतिबंधक अमलीपदार्थ वा मानवी तस्करी अनेकदा उघडकीस आली आहे, पण मागील पाच वर्षांत विदेशातून तब्बल २० आलिशान गाड्यांची भारतात तस्करी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजकारणातील लोकांशी असलेले संबंध वापरून आरोपी अशा गाड्यांची भारतात तस्करी करीत होते. २०१६ पासून तब्बल २० महागड्या आलिशान गाड्यांची छुप्या पद्धतीने तस्करी केली आहे. मात्र, यात २५ कोटी रुपयांचा सरकारी कर बुडवल्याचे दिसून आल्याने महसूल गुप्तचर संचालनालयाने तीन लोकांना अटक केली.
यात गुरुग्राम येथील कार वाहन विक्रेत्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्याचाही समावेश आहे. दरम्यान, चौकशीतून आणखी धक्कादायक बाहेर येण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.