किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, ३ जुलै – बॉलीवूड क्षेत्रातील ख्यातनाम जोडी आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आपल्या १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असून, त्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. किरण राव ही आमिर खानची दुसरी पत्नी होती. या दोघांनी अनेक चित्रपटांच्या प्रकल्पांवर आणि पाणी फाऊंडेशन तसेच इतरही अनेक प्रकल्पांवर एकत्रित काम केले आहे. आम्ही दोघे विभक्त होत असलो तरी एक पालक आणि परिवार म्हणून आम्ही एकत्रित राहू, असे या दोघांनी संयुक्त निवेदन जारी करून म्हटले आहे.
आमिर खान आणि किरण राव यांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, १५ वर्षाच्या सुंदर संसारामध्ये आम्ही सुख, समाधान, आनंदाचे अनेक क्षण अनुभवले. विश्वास, आदर आणि प्रेम यामुळे आमचे संबंध सुंदर होत गेले. आता एक पती आणि पत्नीची जबाबदारी दूर सारून आम्ही पालक आणि एक परिवाराच्या माध्यमातून आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करीत आहोत. हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता, आता त्याची अंमलबजावणी करण्याची योग्य वेळ आली आहे, असे आम्हाला वाटते.
आपल्या संयुक्त निवेदनात आमिर खान आणि किरण राव पुढे म्हणतात की, एकमेकांपासून विभक्त होत असलो तरी आम्ही परिवार म्हणून एकच राहणार आहोत. आम्ही दोघेही पहिल्याप्रमाणेच चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रकल्पांवर एकत्रित काम करणार आहोत. आमच्या या निर्णयाला पाठिंबा देणार्या आमच्या मित्र परिवाराचे आम्ही आभार मानतो. कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही हा निर्णय घेऊ शकलो नसतो.
आम्ही आमच्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे, त्यांनी आजवर दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानतो. या घटस्फोटाकडे सहजीवनाचा शेवट अशा अर्थाने पाहू नये. ही एक नवीन सुरुवात आहे असाच अर्थ घ्यावा, असेही आमिर आणि किरण राव यांनी नमूद केले आहे.