किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशसदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल,
मुंबई, १० जून – मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडमधील मालवणी परिसरात असलेल्या न्यू कलेक्टर कंपाउंडमधील एका तीन मजली चाळीचा काही भाग बुधवारी रात्री उशिरा कोसळला. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून, १७ जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबाबत तीव्र शोक व्यक्त केला.
इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व बचावकार्य सुरू करण्यात आले. काही जणांना ढिगार्याखालून काढण्यात यश आले. मात्र, काही जण ढिगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगार्याखालून जवळपास १६ लोकांना काढण्यात आले आहे. ज्यामध्ये तीन लहान मुले, तीन महिला आणि १० पुरुषांचा समावेश होता. या इमारतीत एकूण दोन ते तीन कुटुंब असल्याची माहिती आहे. खबरदारी म्हणून इमारत रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलवले आहे.
जखमी झालेल्या ८ जणांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर लोकांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिसर दाटीवाटीचा असल्याने घटनास्थळी पोहोचण्यासाठी असलेला रस्ता अरुंद आहे. त्यामुळे बचावकार्यात अडचणी उद्भवल्या. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या, जेसीबी वेळेवर घटनास्थळापर्यंत पोहोचू शकले नाही, अशाही परिस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले. आजूबाजूच्या घरांनाही धोका असल्याने तेथील रहिवाशांना हलवण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
ही घटना रात्री जवळपास साडे अकरा वाजता घडली. सुरुवातीला आसपासच्या लोकांनी एकत्र येत १६ जणांना मलब्यातून काढले. अद्याप काही लोक मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दिवसभर सतत कोसळणार्या पावसामुळे मालाडमधील चार मजल्याची इमारत ३ मजली इमारतीवर कोसळली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दूध आणायला गेल्याने बचावलो, मात्र गमावले कुटुंब
मोहम्मद रफी हे दूध आणायला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास बाहेर पडले. घरी परतल्यानंतर त्यांना समोरचे दृश्य पाहून मोठा धक्काच बसला. ते थोडे घाबरतच पुढे झाले आणि आपण कुटुंबच गमावल्याची जाणीव त्यांना झाली. मोहम्मद रफी यांनी सांगितले की, माझी पत्नी, भाऊ, भावजय आणि परिवारातली सात मुले गमावली आहेत. ही घटना घडली त्यावेळी मी स्वतः दूध खरेदी करण्यासाठी बाहेर गेलो होतो. त्याचवेळी इमारत कोसळली.
मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये
इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला. याशिवाय त्यांनी जखमींची कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी बुधवारी रात्रीच पालिका आयुक्तांशी चर्चा केली तसेच मदत व बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले.