किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 31.05° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.05° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ, तीन तासांत झाला विक्रमी पाऊस,
मुंबई, ९ जून – मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कोसळलेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले. अवघ्या तीन तासांमध्ये झालेल्या विक्रमी पावसामुळे मुंबई पूणर्पर्ण तुंबली होती. सांताक्रूझमध्ये १६४.८ मिमी आणि कुलाबामध्ये ३२.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
चुनाभट्टी रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. यामुळे मुंबईची जीवनवाहिनी हार्बर लोकल ठप्प झाली होती. नोकरी आणि अन्य कामांसाठी बाहेर निघालेल्या लोकांची घराकडे परतताना प्रचंड तारांबळ उडाली होती. रस्त्यांवर कंबरेपेक्षाही जास्त पाणी साचलण्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
ठाण्यातील सखल भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचले. दोन तास सलग पाऊस पडल्याने ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोरच गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. वंदना सिनेमा रोडवर सकाळपासून पावसामुळे प्रचंड पाणी साचले होते. आसपासच्या घरांमध्ये पाणी घुसले होते.
भिवंडीत उड्डाणपुलावर पाणी
भिवंडी शहरात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने राजीव गांधी उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. महत्त्वाचे म्हणजे, हा उड्डाणपूल धोकादायक असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले आहे. कल्याण नाका परिसरात रस्त्यावर तलावाचे स्वरूप आले होते. मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली.
मुख्यमंत्री नियंत्रण कक्षात
मुंबईतील पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट महापालिकेच्या नियंत्रण कक्षात पोहोचले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्हाधिकार्यांकडूनही परिस्थितीचा आढावा घेतला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस सुरू असून, देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. चोवीस तासांत कणकवली तालुक्यात सर्वाधिक १०५ मिमी पावसाची नोंद झाली.