किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 31.05° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.05° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश७० कोरोनाबाधितांना सुरक्षित बाहेर काढले,
मुंबई, २६ मार्च – मुंबईच्या भांडूप परिसरातील ड्रीम मॉलच्या इमारतीत असलेल्या सनराईस रुग्णालयाला गुरुवारी उशिरा रात्री लागलेल्या भीषण आगीत दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, ७० बाधितांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
या मॉलमध्ये सुमारे ६०० दुकाने आहेत. मुंबई महापालिकेने आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, या आगीत केवळ कोरोनाबाधितांचाच मृत्यू झाला की मॉलमध्ये काम करणार्या इतरांचाही त्यात समावेश आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
या चार मजली मॉलच्या सर्वांत वरच्या मजल्यावर सनराईज रुग्णालय असून, तिथे कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्यानंतर लगेच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पहाटेपर्यंत आग नियंत्रणात आणण्यात आली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७० बाधितांना वाचविण्यात मदत व बचाव पथकांना यश आले. या सर्वांना दुसर्या रुग्णालयात नेण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्याने दिली.
दोषी आढळल्यास कारवाई : उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी घटनास्थळाला भेट दिली. कोरोनाच्या काळात काही रुग्णालयांना परवानगी देण्यात आली होती, त्यापैकी हे एक रुग्णालय आहे. या रुग्णालयाला दिलेली परवानगी ३१ तारखेला संपणार आहे. बर्याच बाधितांना वाचविण्यात यश आले. काही जण व्हेंटिलेटरवर होते, त्यांना हलविण्यासाठी थोडा अवधी लागला. यात त्यांचा मृत्यू झाला. आग नेमकी कशामुळे लागली, याची चौकशी केली जाईल. यात कुणाचा दोष असेल तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
हात जोडून मागितली माफी
मुख्यमंत्री ठाकरे यांनी दोन्ही हात जोडून, आगीच्या घटनेसाठी माफी मागितली. ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदतही जाहीर केली.