किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 31.05° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.05° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, १३ मार्च – मनसुख हिरेन यांच्या मृत्युप्रकरणी संभाव्य अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेणारे पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अंतरिम जामीन देण्यास सत्र न्यायालयाने आज शनिवारी नकार दिला.
हिरेन मृत्युप्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक आहे. यासाठी प्रसंगी तुम्हाला कोठडीत घ्यावे लागणार आहे. आमच्याकडे जे पुरावे आहेत, ते पाहू जाता, तुम्हाला दिलासा देता येणार नाही, असे निरीक्षण न्या. शैलेंद्र तांबे यांनी आपला निकाल देताना नोंदविले.
वाझे यांनी शुक्रवारी सायंकाळी अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. तपासात संपूर्ण सहकार्य करीत असल्याने, अंतरिम दिलासा दिला जावा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती. मात्र, अतिरिक्त सरकारी वकील विवेक कडू यांनी यास विरोध केला. या प्रकरणाचा तपास आता महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्यात आला असल्याने, जामीन देणे योग्य होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
आठ तास कसून चौकशी
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या जिलेटिन कारप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने पोलिस अधिकारी सचिन वाझेंची सुमारे आठ तास कसून चौकशी केली.
तपास एनआयएकडे?
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा तपास याआधीच एनआयए करीत आहे. मनसुख हिरेन हेच स्फोटकांच्या गाडीचे मालक आहेत. त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने हे प्रकरण प्रचंड गाजत आहे.