किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशविरोधकांच्या दबावानंतर निर्णय,
मुंबई, १२ मार्च – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी वादात सापडलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली झाली आहे.
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अडचणीत सापडलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) बदली करण्यात आली होती. यासंदर्भात पोलिस मुख्यालयातून गुरुवारी रात्री अधिकृत पत्रक निघाले होते. मात्र, आता पुन्हा त्यांची एसबी-१ म्हणजेच विशेष शाखेत त्यांची कागदोपत्री बदली करण्यात आली आहे.
विधिमंडळातच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांना गुन्हे शाखेतून काढत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यांची बदली करण्यात आली आहे. एसबी १ म्हणजेच विशेष शाखेत वाझे यांची कागदोपत्री बदली करण्यात आली असली तरी ते पोलिस आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्राच्या सेवेत राहतील. मात्र, या बदली नाट्यावरून त्यांना कोणते अधिकारी पाठीशी घालत आहेत, या चर्चेला उधाण आले आहे.
सचिन वाझे मुंबई पोलिसात गुप्तचर विभागाचे प्रमुख होते. पण, मनसुख हिरेन प्रकरणात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने त्यांचे नाव लावून धरले होते. मनसुख हिरेन हे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक होते. त्यांचा मृतदेह ५ मार्च रोजी समुद्रकिनारी सापडला. देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख यांच्या पत्नीचा जबाब सभागृहात वाचून दाखवला, त्यामध्ये मनसुख यांच्या हत्येसाठी त्यांच्या पत्नीने थेट सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
वाझेंवर हिरेन यांच्या पत्नीने खुनाचा आरोप केला आहे. तरीही त्यांना या पदावर ठेवले जात असल्यास पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना पाठीशी घालण्याचे कारण काय, असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत होता. यानंतर सभागृहातच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करीत असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यासंबंधीचा प्रत्यक्ष आदेश गुरुवारी रात्री काढण्यात आला.