किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– एकनाथ शिंदे यांचे लोकसभेच्या सभापतींना पत्र,
– गजानन कीर्तीकर यांची नव्याने नियुक्ती,
नवी दिल्ली, (२३ मार्च) – शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून खासदार संजय राऊत यांना हटवले आहे. त्यांच्या जागी संसदीय नेतेपदी खासदार गजानन कीर्तीकर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत मु‘यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून माहिती दिली आहे. या माध्यमातून शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे शिवसेनेकडून कीर्तीकर संसदेत व्हिप काढू शकतात. म्हणजेच, कीर्तीकरांचा व्हीप संजय राऊतांनी न पाळल्यास अपात्रतेची कारवाई देखील होऊ शकते. अपात्रतेची कारवाई झाल्यास राऊतांची खासदारकीही जाऊ शकते. संसदेत शिवसेनेच्या खासदारांचा विचार केला तर, लोकसभेत एकूण १८ खासदारांपैकी शिंदेंच्या शिवसेनेसोबत १३ खासदार आहेत. ठाकरे गटासोबत पाच खासदार आहेत. राज्यसभेत एकूण तीन खासदार आहेत. तिन्ही खासदार ठाकरे गटाकडे आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर शिवसेनेच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. आता शिंदे गटाकडून संजय राऊत यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्याऐवजी लोकसभा खासदार गजानन कीर्तीकर यांची संसदेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.