किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलमुंबई, (१० जानेवारी) – सध्याची खासदारकीची कारकीर्द संपायला अजून अडीच वर्षे आहे. ती संपल्यानंतर मी कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा शरद पवार यांनी मुंबईत केली.
येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार शरद पवार यांच्या वयावरून सातत्याने टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वीही त्यांनी काही जण ८४ वर्षांचे झाले तरी थांबत नाहीत, असे म्हणत शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला. यावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नात शरद पवार यांनी उपरोक्त निर्णय घेतला. अडीच वर्षांनंतर माझी खासदारकी संपत आहे. त्यानंतर मी निवडणूक लढणार नाही. कारकीर्द शिल्लक आहे, तोपर्यंत काम करीत राहणार आहे. मला लोकांनी तिथे पाठवले, मग मी काम करायला नको का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माझ्या वयावर सातत्याने बोलले जाते. मी १९६७ पासून राजकारणात आहे. माझ्या विरोधकांनीही कधी यावर टीका केली नाही. असा संताप त्यांनी व्यक्त केला. मी अनेक संस्थांचा आजीवन अध्यक्ष आहे. तिथे मी काम करीत राहणार आहे, असेही शरद पवार म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ qशदे यांच्या भेटीवर पवार म्हणाले, साधी गोष्ट आहे, ज्यांच्यापुढे प्रकरड आहे आणि ज्यांचे प्रकरण आहे, त्यांनी ते मांडणे यात काही चूक नाही. मात्र, ज्याच्याकडे प्रकरण मांडले जाते आणि ज्यांचा निर्णय अभिप्रेत आहे, तेच जर ज्यांचे प्रकरण आहे, त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला जागा निर्माण होते. ही भेट झाली नसती तर, या पदाची प्रतिष्ठा जपली गेली असती.