किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, (०४ जानेवारी) – आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची गुरुवारी राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. संभाव्य पोलिस महासंचालकपदाच्या सेवा ज्येष्ठतेच्या यादीत रश्मी शुक्ला यांचे नाव अग्रस्थानी होते. शुक्ला यांना मुंबई पोलिस आयुक्त करणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक असणार आहेत. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवार २९ डिसेंबर रोजी बैठक घेतली. यावेळी महासंचालक पदासाठी अधिकाऱ्यांच्या नावांची यादी त्यांनी पाठवली. यात सर्वांत पहिले नाव रश्मी शुक्ला यांचे नाव होते. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांंना निर्णय घ्यायचा होता. अखेर आज शासनाने शुक्ला यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. रश्मी शुक्ला यांना सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. त्यानंतर राज्य सरकार त्यांना मुदतवाढ देऊ शकते.
रश्मी शुक्ला १९८८ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिस दलातील सर्वांत वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी सशस्त्र सीमा बलाच्या केंद्रप्रमुख म्हणूनही जबाबदारी पार पाडली. त्याशिवाय पुणे पोलिस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले.
फोन टॅपिंग प्रकरणात नाव चर्चेत
रश्मी शुक्ला यांचे नाव राज्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये चर्चेत आले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्र्यांचे, नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यावेळी शुक्ला या राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या.