किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– सत्यशोधक सिनेमा करमुक्त,
– मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय,
मुंबई, (१० जानेवारी) – अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होणार आहे. या सोहळ्याच्या दिवशी देशात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या पृष्ठभूमीवर दिवाळीप्रमाणेच राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
यानुसार या शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शिवजयंती आणि राम मंदिराच्या निमित्ताने आनंदाच्या शिधाचे वाटप केले जाणार आहे. याआधी आनंदाचा शिधा हा दसरा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त देण्यात आला होता. जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत या आनंदाच्या शिध्याचे वाटप केले जाणार आहे, असे राज्य सरकारने जाहीर केले आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीतील इतर निर्णय
– राज्यात नागरी भागातील अतितीव‘ कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता.
– ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मंजुरी.
– शासकीय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक ४४ द्वारे) आहरित करण्यात आलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकारी आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकारी यांच्यासाठी आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती करण्यास मंजुरी.
– ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणार्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी.
– जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या कार्यालयातील कर्मचार्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी.
– पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी पात्र लाभार्थींना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान ५० हजारांवरून एक लाखांपर्यंत करण्यास मान्यता.
– महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम-१९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरित न झालेल्या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रकम स्वरूपात आर्थिक पॅकेज देणार.