किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.82°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– विधानसभाध्यक्ष अॅड. नार्वेकरांनी दिला निकाल,
– उद्धव ठाकरे गटाला धक्का,
मुंबई, (१० जानेवारी) – राज्याच्या राजकारणातील मागील दीड वर्षांपासून बहुप्रतिक्षित असलेला १६ आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर बुधवारी लागला. यात शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. दोन्ही गटांचे आमदार त्यांनी पात्र ठरवले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला जबर हादरा बसला आहे.
कित्येक महिन्यांपासून १६ आमदार अपात्र होणार, सरकार पडणार असे दावे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केले जात होते. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून अपात्रतेच्या एकूण ३४ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर कार्यवाही सुलभपणे व्हावी म्हणून या याचिका ६ गटांत विभागल्या होत्या. यामध्ये व्हिपचे उल्लंघन आणि बहुमत प्रस्तावात विरोधी मतदान केल्याचे आरोप होते. सदर याचिका शिवसेनेची मूळ घटना, निवडणूक आयोगाचा पक्ष आणि चिन्ह देण्याचा जाहीर केलेला निर्णय, घटनेचे दहावी अनुसूची, सर्वोच्च न्यायालयाने व कर्नाटक सार‘या अन्य राज्याच्या उच्च न्यायालयांच्या निकालाच्या आधारे विधानसभाध्यक्षांनी बुधवारी निकाली काढल्या.
यावेळी अॅड. नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून मी निकाल देत असल्याचे सांगताना, प्रत्येक गटातील ठळक मुद्दे मी वाचून दाखवणार आहे. सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्र सरकार अध्यक्षांकडून संपूर्ण निकाल पत्र न वाचता निरीक्षण वाचून दाखवतो. घटना, पक्षीय रचना आणि विधीमंडळ पक्ष यावर हा निकाल आधारित असेल, अशी भूमिका नार्वेकरांनी सुरुवातीलाच स्पष्ट केली. अॅड. नार्वेकरांना घटनेच्या दहाव्या सूचीनुसार शिवसेना कुणाची?, अधिकृत व्हिप कुणाचा?, बुहमत कुणाचे, याबाबत निर्णय घ्यायचा होता. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १० जानेवारीपर्यंतची मुदत विधानसभा अध्यक्षांना दिली होती.
विधिमंडळातील बहुमत असलेला खरा पक्ष
पक्षात दोन गट असतील तर ते परस्परांवर आक्षेप घेऊ शकतात, आरोप करू शकतात. मात्र, विधिमंडळातील बहुमत ज्याच्याकडे तोच खरा पक्ष असतो. त्यामुळे विधिमंडळ पक्ष ज्याचा त्याचाच राजकीय पक्ष असल्याचा निर्वाळा विधानसभाध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकरांनी यावेळी दिला.
ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र अमान्य
१६ आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभाध्यक्षांसमोर ठाकरे गटाने सादर केलेले प्रतिज्ञापत्र अध्यक्षांनी विचारात घेण्यास नकार दिला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उलट तपासणीला आले नाहीत म्हणून ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरण्यात आले नाही. प्रतिज्ञापत्रच फेटाळून लावल्याने त्यात करण्यात आलेले दावे आपसूकच निरस्त झाले.
घटनादुरुस्ती बेकायदेशीर
उद्धव ठाकरे यांनी २०१८ मध्ये केलेली घटना दुरुस्ती ही बेकायदेशीर होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. ते कोणालाही पदावरून दूर करू शकत नाही. पक्षातील कुठलाही निर्णय घ्यायचा अधिकार हा राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे. यापृष्ठभूमीवर निवडणूक आयोगाकडे असलेली १९९९ च्या घटनेनुसार शिवसेना पक्षासंदर्भात निर्णय घेतला गेला असल्याचे अध्यक्ष अॅड. नार्वेकर यावेळी म्हणाले.
संपर्काच्या बाहेर गेले म्हणून अपात्र ठरवता येत नाही
संपर्काच्या बाहेर गेले, केवळ या एका कारणास्तव आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही. शिवाय, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक यांनी सुरत येथे जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हेदेखील यावेळी सिद्ध झाले आहे. सत्तांतराच्या काळात खरा पक्ष हा शिंदेंचा हे यापूर्वीच सिद्ध झाल्याने २१ जून २०२२ च्या शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील गैरहजरीच्या मुद्यावर आमदारांना अपात्र ठरविता येणार नसल्याचे, निरीक्षण नोंदवत अध्यक्ष अॅड. नार्वेकरांनी १६ आमदारांविरुद्धची अपात्रता याचिका खारीज केली. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्र करण्याची याचिका देखील खारीज करत, यांनादेखील अपात्र करता येत नसल्याचा निर्वाळा अॅड. नार्वेकरांनी यावेळी दिला.
भरत गोगावलेच कायदेशीर प्रतोद
ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू होते. शिंदे गटाने भरत गोगावलेंना प्रतोद म्हणून नियुक्त केले होते. यावेळी जर मूळ पक्ष आणि विधिमंडळ पक्षच शिंदे यांचा असल्याने गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती ही ग्राह्य मानल्या गेल्याने, त्यांनी नियुक्त केलेला प्रतोद हाच अधिकृत असेल, असा निर्वाळा निकालात देण्यात आला.