किमान तापमान : 25.57° से.
कमाल तापमान : 26.73° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 0.8 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.57° से.
24.79°से. - 27.42°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.9°से. - 28.22°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.29°से. - 28.78°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल25.32°से. - 29.32°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.57°से. - 28.61°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.29°से. - 28.83°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादलमुंबई, (०२ मार्च) – हा विषय अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे. हिंसक वक्तच्याचे कोणीही समर्थन करू शकत नाही. हिंसा अथवा हिंसक वक्तव्याला लोकशाहीत कुठेही स्थान नाही. ज्याचा लोकशाहीवर विश्वास आहे, तो कधीही असा मार्ग अवलंबणार नसल्याचा विश्वास व्यक्त करीत, विधानसभाध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी संसदीय लोकशाहीला जपणे ही सभागृहाची जबाबदारी असून, त्यासाठी उपाययोजना करणे ही सरकारची जबाबदारी आहे. राज्यात किंवा देशात चुकीचा संदेश जाणे, अत्यंत घातक आहे. त्यामुळे शासनाने या घटनेची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करावी, असा निर्देश सरकारला दिला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी सभागृहाचे कामाकज सुरू होताच, भाजपाचे आमदार अॅड आशिष शेलार यांनी माहितीच्या मुद्याद्वारे सदर विषय उपस्थित केला. ते म्हणाले, महाराष्ट्र बेचिराख करण्याचे कोणी ठरवले, या षडयंत्राची योजना पहिलेच ठरली होती काय, ही धमकी आहे काय, असे धमकी देण्यामागची भूमिका काय, हे कोणाचे कटकारस्थान आहे, या सर्व गोष्टींची शहानिशा झाली पाहिजे.
या हिंसाचाराचा बोलवता धनी कोण आहे, आंदोलन कुणी पेटवले, जरांगेंचा कोणत्या नेत्याशी संबंध आहे, कुठल्या नेत्यासोबत यांचा फोटो आहे, या सर्व गोष्टीची एसआयटी चौकशी करण्याची मागणी अॅड. शेलारांनी केली. त्यानंतर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला या सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचा आदेश दिला.