किमान तापमान : 25.35° से.
कमाल तापमान : 25.78° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 2.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.78° से.
24.27°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलप्रयागराज, (२८ मार्च) – माफिया अतिक अहमदला प्रयागराजच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. १७ वर्षीय उमेश पाल अपहरण प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिक टोळीविरुद्ध पोलिस रेकॉर्डमध्ये १०१ गुन्हे आहेत. त्यापैकी दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आलेली ही पहिलीच घटना आहे. अतिक व्यतिरिक्त खान सुलत आणि दिनेश पासी यांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायाधीश दिनेश चंद्र शुक्ला यांनी फरहान, जावेद उर्फ बज्जू, आबिद, इसरार, आशिक उर्फ मल्ली, एजाज अख्तर यांच्यासह अतिकचा भाऊ अशरफ उर्फ खालिद अझीम यांना या प्रकरणात निर्दोष मुक्त केले आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर उमेश पालची आई शांती देवी म्हणाल्या, अतिक अहमदने माझ्या मुलाची हत्या केली. तीन जणांना जीव गमवावा लागला. तो जुना भयंकर बदमाश आणि डाकू आहे, तो नोटांच्या जोरावर काहीही करू शकतो. त्यामुळे त्यांना फाशी द्यावी, अशी माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. केवळ माझा मुलगाच नाही तर दोन सुरक्षा कर्मचारीही मारले गेले. अशा प्रकारे माझ्या तीन मुलांचा बळी गेला आहे. अपहरण प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असली तरी खुनाच्या गुन्ह्यात त्याला फाशीच झाली पाहिजे.
उमेश पाल यांची पत्नी जया पाल म्हणाल्या, मी घरी एकटी आहे. त्यामुळे माझ्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. अतिक याला अपहरण प्रकरणात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयावर मला काहीही बोलायचे नाही. माझ्या पतीच्या हत्येप्रकरणी अतिकला फाशी द्यावी, अशी माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. अतिक यांना न्यायालयात नेले असता आवारातील वकिलांनी ’फांसी दो फांसी’च्या घोषणा दिल्या. नैनी मध्यवर्ती कारागृहातून आतिकला बंद व्हॅनमधून न्यायालयात आणण्यात आले. त्यात सीसीटीव्ही कॅमेरे आणि पडदे होते. कोर्टापर्यंतचे १० किमीचे अंतर २८ मिनिटांत कापले. अहमदाबादच्या साबरमती तुरुंगातून अतिक आणि त्याचा भाऊ अशरफला बरेली तुरुंगातून सोमवारी संध्याकाळी प्रयागराजला आणण्यात आले. दोघांना नैनी मध्यवर्ती कारागृहातील उच्च सुरक्षा बराकीत ठेवण्यात आले होते.