किमान तापमान : 24.69° से.
कमाल तापमान : 24.89° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.94 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.89° से.
24.41°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल– छत्तीसगडमधील कोळसा वाहतूक वसुली प्रकरण,
रायपूर, (२९ मार्च) – छत्तीसगडमधील कोळसा वाहतूक वसुली प्रकरणाची चौकशी करणार्या अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि काँग्रेस नेत्याच्या संबंधित ठिकाणांवर बुधवारी छापेमारी केली. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, व्यावसायिक, राजकारणी आणि मध्यस्थांचा समावेश असलेले टोळके छत्तीसगडमधून वाहतूक केल्या जाणार्या कोळशावर प्रती टन २५ रुपयांप्रमाणे वसुली करायचे.
या प्रकरणाचा तपास ईडी करीत आहे. आयएएस अधिकारी अनिलकुमार तुतेजा, राजपूरचे महापौर आणि काँग्रेस नेते एजाझ ढेबर आणि मद्य व्यावसायिक बलदेवसिंह भाटिया उर्फ पप्पू भाटिया यांच्या निवासस्थानी निमलष्करी दलाचे जवान असल्याची बुधवारी सकाळी दिसून आले. ही छापेमारी अद्याप सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तुतेजा हे राज्याच्या औद्योगिक आणि वाणिज्य विभागाचे सहसचिव आहेत. ईडीने मंगळवारी वरिष्ठ आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा, बडा व्यावसायिक कमल सारडा आणि इतरांच्या निवासस्थानांवर छापेमारी केली होती.