किमान तापमान : 25.35° से.
कमाल तापमान : 25.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
24.27°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलनवी दिल्ली, (२९ मार्च) – जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील चारही दोषींना राजस्थान उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या प्रकरणातील फाशीच्या संदर्भासह दोषींनी सादर केलेल्या २८ अपीलांवर न्यायालयाने निकाल दिला आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने दोषींचे अपील मान्य करताना त्यांच्या बाजूने दिलासा देणारा निर्णय दिला आहे. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पंकज भंडारी आणि न्यायमूर्ती समीर जैन यांच्या खंडपीठाने या प्रकरणी निकाल दिला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरलेल्या अल्पवयीन मुलाचे प्रकरण ज्युवेनाईल बोर्डाकडे पाठवले आहे. इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
याआधी २०१९ मध्ये जयपूरच्या कनिष्ठ न्यायालयाने जयपूर बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल देताना या प्रकरणातील चार आरोपींना दोषी ठरवले होते. आरोपींना यूएपीएच्या विविध कलमांतर्गत दोषी ठरवण्यात आले होते. त्याचवेळी न्यायालयाने एका आरोपीची निर्दोष मुक्तताही केली होती. वास्तविक या प्रकरणात पाच आरोपी होते. २०१९ मध्ये जेव्हा कनिष्ठ न्यायालयाने सुनावणी केली तेव्हा त्यापैकी चार दोषी आढळले, तर एकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली. २०१९ मध्ये न्यायालयाने या प्रकरणात आरोपी शाहबाज हुसेनची निर्दोष मुक्तता केली होती. तर मोहम्मद सैफ, सरवर आझमी, सैफुर रहमान आणि एका अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, पाचही आरोपी उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत.