किमान तापमान : 26.73° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 3.19 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
24.55°से. - 27.39°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.4°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.77°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.73°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.16°से. - 28.59°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.07°से. - 27.85°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, (२९ मार्च) – अमृतपालने नुकताच एक व्हिडिओ जारी केला आहे. त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर एनएसए लागू करण्यात आल्याचे त्याने सांगितले. व्हिडिओमध्ये अमृतपाल सिंहने १८ मार्चच्या घटनेबद्दल सांगितले.
या व्हिडिओच्या माध्यमातून फरारी अमृतपाल म्हणाला की, मी देश-विदेशातील सर्व शीख लोकांना आवाहन करतो की, त्यांनी बैसाखीच्या दिवशी होणार्या सरबत खालसा कार्यक्रमात सहभागी व्हावे. बराच काळ आपला समाज छोट्या छोट्या मुद्द्यांवर मोर्चे काढण्यात मग्न आहे. पंजाबचे प्रश्न सोडवायचे असतील तर एकत्र राहावे लागेल. सरकारने आमची ज्या प्रकारे फसवणूक केली आहे, ते लक्षात ठेवावे लागेल. अनेक सहकार्यांना अटक करण्यात आली आहे आणि एनएसए लादण्यात आली आहे, माझ्या अनेक सहकार्यांना आसामला पाठवण्यात आले आहे. म्हणूनच मी सर्व शीख बांधवांना बैसाखीच्या निमित्ताने एकत्र येण्याचे आवाहन करतो.
व्हिडिओमध्ये अमृतपाल म्हणतो की, सरकारने ज्या प्रकारे लोकांमध्ये भीती निर्माण केली आहे, त्यामुळे शीख या सरबत खालसामध्ये सहभागी होण्यास तयार आहेत. यावेळची बैसाखी ऐतिहासिक ठरावी. सरबत खालसा हा एक मेळावा आहे ज्यामध्ये अनेक शीख संघटना भाग घेतात. या दरम्यान, पंथ संघटना संकटावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करतात. त्यानंतर जो काही निर्णय घेतला जातो, तो तख्त साहिबचे जथेदार समाजाला पाळण्याचे आदेश देतात. अमृतपालने त्याचा एक रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पंजाबीमध्ये रिलीज केला आहे. या व्हिडिओमध्ये अमृतपाल पुन्हा एकदा लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिस आणि यंत्रणेला आव्हान देत फरार अमृतपाल म्हणतोय की आता वेळ आली आहे, लोकांनी सज्ज व्हावे. जर तुम्ही जागे झाले नाही तर ते पुन्हा कधीही होणार नाही. त्याचवेळी तो पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान देत आहे. त्याच्या अटकेच्या प्रकरणावर अमृतपाल उघडपणे सांगत आहे की, त्याच्या केसाला कोणीही धक्का लावू शकत नाही.