किमान तापमान : 26.14° से.
कमाल तापमान : 27.37° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.37° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादल-मिटिलिया गावात लोक बाहेरच झोपतात,
अहमदाबाद, (२६ फेब्रुवारी ) – गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात मागील दोन वर्षांत सुमारे भूकंपाचे ४०० धक्के नोंदवले गेले. त्यामुळे हा जिल्हा भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे अधिकार्याने सांगितले. या भूकंपाची वारंवार पुनरावृत्ती होते. लहान भूकंपाचा एक क्रम आहे, जो अल्पकाळ टिकतो. अमरेलीच्या मिटियाला गावात ४०० पैकी अनेक भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे तेथील लोकांनी सावधगिरीचा उपाय म्हणून घराबाहेर झोपणे सुरू केले. सौराष्ट्र प्रदेशातील अमरेली जिल्ह्यात ‘भूकंपाच्या झुंडी’मागील कारण स्पष्ट करताना, गांधीनगर येथील भूकंपशास्त्रीय संशोधन संस्थेचे कार्यकारी महासंचालक सुमेर चोप्रा यांनी सांगितले की, टेक्टोनिक सेटअप आणि हायड्रोलॉजिकल लोडिंग ही हंगामी भूकंपाच्या कि‘याकलापांची कारणे आहेत.
२३ फेब्रुवारीपासून ४८ तासांत अमरेलीच्या सावरकुंडला आणि खांबा तालुक्यात ३.१ ते ३.४ तीव्रतेचे चार धक्के जाणवले. ज्यामुळे स्थानिक चिंताग्रस्त झाले. अलिकडेच तुर्की येथे झालेल्या भूकंपानंतर अमरेलीमध्ये भूकंपाची क्रिया दिसून आली आहे. जानेवारी २००१ मध्ये, गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात झालेल्या भूकंपात १३,८०० लोकांचा मृत्यू झाला आणि १.६७ लाख लोक जखमी झाले होते. अमरेलीमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपाबद्दल विचारले असता चोप्रा म्हणाले की, ही एक भूकंपाची वारंवार होणारी घटना आहे.
गेल्या दोन वर्ष आणि दोन महिन्यांत, आम्ही अमरेलीमध्ये ४०० सौम्य भूकंपाची नोंद केली, त्यापैकी ८६ टक्के धक्के २ च्या तीव्रतेपेक्षा कमी होते, तर १३ टक्के २ आणि ३ च्या तीव्रतेच्या दरम्यान होते आणि फक्त पाच घटनांमध्ये ३ तीव्रतेच्या वर गेला. यापैकी बहुतेक सौम्य हादरे लोकांना जाणवतही नाहीत. फक्त आमच्या मशीनमध्ये नोंद होते, असे सुमेर चोप्रा यांनी सांगितले.