किमान तापमान : 26.14° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादल– हिमाचल प्रदेशात प्रदूषणमुक्त वाहतूक सेवांना प्रोत्साहन,
शिमला, (२६ फेब्रुवारी ) – हिमाचल प्रदेशात प्रदूषणमुक्त वाहतूक सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्याच्या सुखविंदर सिंग सुखू सरकारने इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी, चार्जिंग स्टेशन्सची स्थापना आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जलद गतीने काम करत आहे. इलेक्ट्रिक वाहने, विशेषत: चार्जिंग स्टेशनशी संबंधित सर्व आवश्यक व्यवस्थेबाबत परिवहन विभाग सर्व औपचारिकता पूर्ण करत आहे. विशेष बाब म्हणजे एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हे इलेक्ट्रिक वाहन ३०० किलोमीटरपर्यंत सहज चालवता येऊ शकतील अशी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
या संबंधित अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, आगामी काळात सरकार हिमाचल प्रदेशातील सहा प्रमुख रस्ते ग्रीन कॉरिडॉर म्हणून विकसित करणार आहे. चार पदरी आणि दुपदरी राष्ट्रीय महामार्गांसह हे सहा मुख्य रस्ते राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्याचा समावेश करतील. त्यामुळे या मार्गांवर प्राधान्याने पुरेशा चार्जिंग स्टेशनसाठी जागा शोधण्यात येत आहेत. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, हमीरपूर जिल्ह्यातही याची सुरुवात झाली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी, हमीरपूर यांच्यासाठी इलेक्ट्रिक वाहनही आले आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार आता सर्व शासकीय विभागांमध्ये केवळ इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली जाणार असून पेट्रोल आणि डिझेल वाहने टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकार्यांना दिलेले इलेक्ट्रिक वाहन अतिशय किफायतशीर, सोयीचे आणि पूर्णपणे प्रदूषणमुक्त आहे. हमीरपूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी या संदर्भात म्हणाले की, आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन परिवहन विभागाने जिल्ह्यातील विविध भागात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी ठिकाणेही निश्चित केली आहेत.