किमान तापमान : 26.65° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.8°से. - 31.14°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.12°से. - 30.05°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.98°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.2°से. - 29.96°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.23°से. - 29.78°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.26°से. - 29.34°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादलअयोध्या, (१७ जानेवारी) – उत्तर प्रदेश सरकार रामभक्त आणि पर्यटकांना हेलिकॉप्टरने अयोध्या धामला जाण्याची परवानगी देणार आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांतून सरकार हेलिकॉप्टर सेवा देणार आहे.
प्रधान सचिव (पर्यटन) मुकेश मेश्राम यांनी पीटीआयला सांगितले की या महिन्याच्या अखेरीस लखनौ येथून हेलिकॉप्टर सेवा सुरू केली जाईल. ते म्हणाले की, राज्यातील सहा जिल्ह्यांतून सुरू होणार्या हेलिकॉप्टर सेवेसाठी शासनाने सेवा पुरवठादार ऑपरेटरची निवड केली आहे. पर्यटन विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राम भक्त आणि पर्यटकांना गोरखपूर, वाराणसी, लखनौ, प्रयागराज, मथुरा आणि आग्रा येथून हेलिकॉप्टर सेवा मिळेल. येत्या काळात राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही ही सुविधा लवकरच सुरू होणार आहे.
प्रधान सचिव पर्यटन मेश्राम म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रामभक्तांना हेलिकॉप्टरची सुविधा देण्याच्या सूचना दिल्या असून त्याअंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यांतून हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात येत आहे. सरकार भाविकांना अयोध्या शहर आणि राम मंदिराचे हवाई दर्शनही देणार असून याची जबाबदारी पर्यटन विभागाकडे देण्यात आली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या सुविधेसाठी भाविकांना आगाऊ बुकिंग करावे लागणार आहे.
निवेदनानुसार, राम भक्त सरयू किनार्यावरील पर्यटक गेस्ट हाऊसजवळील हेलिपॅडवरून उतरू शकतील. याअंतर्गत भाविकांना राम मंदिर, हनुमानगढी, सरयू घाटासह प्रसिद्ध पर्यटन स्थळांची हवाई सफरही करून दिली जाणार आहे.
निवेदनात सांगण्यात आले की, या हवाई प्रवासाची कमाल वेळ १५ मिनिटे असेल तर प्रति भक्त भाडे ३,५३९ रुपये निश्चित करण्यात आले आहे. या सुविधेद्वारे एकावेळी पाच भाविकांना विमान प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. एका प्रवासादरम्यान हेलिकॉप्टरसाठी ४०० किलो वजनाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. एका भाविकाला जास्तीत जास्त पाच किलो सामान घेऊन प्रवास करता येणार आहे.
निवेदनानुसार भाविक हेलिकॉप्टरने गोरखपूरहून अयोध्या धामला जाऊ शकतील. हे अंतर १२६ किलोमीटर असेल जे ४० मिनिटांत पूर्ण होईल. यासाठी प्रति भक्त भाडे ११,३२७ रुपये निश्चित करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पहिल्या टप्प्यात राजधानी लखनऊसह सहा धार्मिक स्थळांवरून हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात येत आहे. आगामी काळात मागणीनुसार या सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे.
वाराणसीतील नमो घाट येथून भाविकांना हेलिकॉप्टर सेवेचा लाभ घेता येणार असल्याचे पर्यटन सचिवांनी सांगितले. हे अंतर १६० किमी असेल, जे ५५ मिनिटांत पूर्ण करता येईल. यासाठी १४,१५९ रुपये प्रति भक्त भाडे निश्चित करण्यात आले आहे. लखनौ येथील रमाबाई येथून भाविकांना हेलिकॉप्टर सेवेचा लाभ घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे अंतर १३२ किमी असेल, जे ४५ मिनिटांत पूर्ण करता येईल. यासाठी १४,१५९ रुपये प्रति भक्त भाडे निश्चित करण्यात आले आहे.
तसेच प्रयागराजमधील ’टुरिझम गेस्ट हाऊस’जवळील हेलिपॅडवरून हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध असेल. हे अंतर १५७ किलोमीटर आहे जे ५० मिनिटांत पार केले जाईल. यासाठी १४,१५९ रुपये प्रति भक्त भाडे निश्चित करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, बरसाना, मथुरा येथील गोवर्धन परिक्रमाजवळील हेलिपॅड आणि आग्रा येथील आग्रा एक्स्प्रेस वेजवळील हेलिपॅडवरून या सेवेचा लाभ घेता येईल, हे अंतर अनुक्रमे ४५६ किमी आणि ४४० किमी असेल, जे सुमारे १३५ मिनिटांत पूर्ण होईल. यासाठी प्रति भक्त भाडे ३५,३९९ रुपये निश्चित करण्यात आले आहे.
राज्यातील सहा जिल्ह्यांतील हेलिकॉप्टर सेवेचे निश्चित भाडे केवळ एकेरी प्रवासासाठी आहे. अयोध्या धाम येथून भाविकांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी सुधारित भाडे द्यावे लागणार आहे. भाविकांच्या संख्येनुसार हेलिकॉप्टर आपल्या गंतव्यस्थानापासून अयोध्या धामपर्यंत दररोज उड्डाण करेल.