किमान तापमान : 26.94° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.97°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.73°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.81°से. - 29.63°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.54°से. - 29.57°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.84°से. - 29.35°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.78°से. - 28.96°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादलअयोध्या, (१७ जानेवारी) – रामनगरी अयोध्येतील अनेक वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे. येथे राम मंदिराचे भव्य बांधकाम सुरू आहे. २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. रामभक्त रामललाच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. राममंदिराच्या कार्यक्रमापूर्वीच येथे भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. तुम्हीही रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला अयोध्येला पोहोचण्यापूर्वी आणि नंतर काय करायला हवे ते सांगणार आहोत.
आधार कार्ड सोबत ठेवा
तुम्ही अयोध्येला जात असाल तर तुमचे आधार कार्ड सोबत ठेवावे. पडताळणीसाठी तुम्हाला आधार कार्ड विचारले जाऊ शकते. याशिवाय कोणत्याही प्रकारच्या तपासातही त्याचा उपयोग होईल. २२ जानेवारीनंतरच सर्वसामान्यांना राम मंदिरात प्रवेश करता येणार आहे.
लॉकर सुविधा मोफत आहे
रामलालाचे दर्शन घेऊ इच्छिणार्या भाविकांना त्यांचे सामान लॉकरमध्ये ठेवावे लागणार आहे. मात्र, लॉकरची सुविधा मोफत आहे. राम मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात लॉकर्स लावण्यात आले आहेत. राम मंदिरात पर्स, मोबाईल यांसारख्या वस्तू नेण्यास मनाई आहे.