किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– गृह मंत्रालयाची मंजुरी,
अयोध्या, (१० जानेवारी) – येत्या २२ जानेवारीला रामललाची प्रतिष्ठापना होणार आहे. सर्वत्र राममय वातावरण आहे. मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर येथे देशविदेशातून अनेक भाविक रामललाच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालायने अयोध्या आणि नवीन महर्षी वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपविली आहे.
सीआयएसएफचे १५० हून अधिक सशस्त्र सुरक्षा कमांडो अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या महर्षी वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत. अधिकृत सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, २२ जानेवारी रोजी रामजन्मभूमी मंदिरात रामललाच्या प्रतिष्ठापनेपूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली. सीआयएसएफ प्रवासी आणि त्यांच्या सामानाची तपासणी करेल आणि इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांप्रमाणेच संरक्षण करेल. प्राप्त माहितीनुसार, केंद्रीय सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांनी केलेल्या पुनरावलोकनात सीआयएसएफद्वारे विमानतळासाठी व्यावसायिक सुरक्षा कवच प्रदान करण्याची शिफारस केली आहे.
२,२०० मीटर लांबीची धावपट्टी
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी गेल्या वर्षी विमानतळाची क्षमता हळूहळू वाढवली जाईल, असे सांगितले होते. पहिल्या टप्प्यात विमानतळ ६५ हजार चौरस फूटमध्ये राहणार आहे. दर तासाला दोन ते तीन उड्डाणे हाताळण्याची क्षमता असेल. २,२०० मीटर लांबीची धावपट्टी तयार करण्याचे काम सुरू आहे. म्हणजे बोईंग ७३७ आणि एअरबस ३१९ आणि ३२० विमानतळावर उतरण्यास सक्षम असेल. सुरुवातीला आठ विमानांसाठी विमानतळावर एप्रन आहे. दुसर्या टप्प्यासाठी लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली जाईल, असेही ते म्हणाले होते.