किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– उत्तर प्रदेश पोलिसांनी वाढवली सतर्कता,
लखनौ, (१७ जानेवारी) – अयोध्येत श्री रामलल्लाच्या अभिषेकासाठी मंगळवारपासून धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. दरम्यान, राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी देशाच्या सुरक्षा गुप्तचर यंत्रणांनी यूपी पोलिसांना दहशतवादी हल्ल्याच्या कटाबद्दल सतर्क केले आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांनी जारी केलेल्या अलर्टमध्ये दहशतवादी अयोध्येत मोठी दहशतवादी घटना घडवण्याची योजना आखत असल्याचे सांगण्यात आले आहे. दहशतवादी कोणत्याही वेशभूषेत येथे येऊ शकतात, त्यामुळे कार्यक्रमस्थळ आणि परिसरात सर्वंकष सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी.
या गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या माहितीनंतर यूपी पोलिस आणि स्थानिक तपास संस्था, एटीएस, एसटीएफ, एलआययू अलर्ट मोडवर आले आहेत. अयोध्या किंवा त्याच्या लगतचे जिल्हे, सुलतानपूर, बाराबंकी, गोंडा, बस्ती आणि लखनौ येथे पोलीस सतर्क आहेत. हॉटेल, गेस्ट हाऊस, ढाब्यावर तपासणी केली जात आहे. अयोध्येला येणार्या सर्व मार्गांवर वाहनांची सखोल तपासणी करण्यात येत आहे.
अयोध्या रेंजचे आयजी प्रवीण कुमार म्हणाले की, अयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कानाकोपर्यात लक्ष ठेवण्यात येत आहे. यूपी पोलिसांनी तीन डीआयजी, १७ आयपीएस आणि १०० पीपीएस दर्जाचे अधिकारी तैनात केले आहेत. यासह ३२५ निरीक्षक, ८०० उपनिरीक्षक आणि एक हजाराहून अधिक हवालदार तैनात करण्यात आले आहेत. चार पीएसी कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. यासाठी १० हजारांहून अधिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ज्या लोकांनी आपल्या दुकानात आणि घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत तेही पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडले गेले आहेत. ड्रेन कॅमेरेही वापरण्यात येणार आहेत. सर्व काम एसपीजीच्या देखरेखीखाली केले जाईल.