किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलगुवाहाटी, (१७ जानेवारी) – काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी राम मंदिराच्या लोकार्पण समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय कार्यक्रम असल्याचे म्हटले आहे. यावरून आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते हेमंत बिस्व शर्मा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. राम मंदिराच्या अभिषेकात सहभागी न होऊन काँग्रेसनेच याला राजकीय कार्यक्रम बनवले आहे, असे शर्मा यांनी म्हटले आहे. २२ जानेवारीला उत्तरप्रदेशातील अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे.
राजधानी दिसपूरमधील पत्रकार परिषदेत राहुल यांच्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आसामचे मुख्यमंत्री म्हणाले की, राहुल गांधी तिथे गेले असते, तर याला राजकीय रंग मिळाला नसता. आम्ही तुम्हाला या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिली आहे जेणेकरून हा एक गैरराजकीय कार्यक्रम राहील. पण, तुम्ही (राहुल गांधी) आणि तुमच्या निकटवर्तीयांनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे हा आता राजकीय कार्यक्रम झाला आहे, जो आजवर नव्हता.
गांधी कुटुंबावर निशाणा साधत शर्मा म्हणाले की, राहुल आणि सोनिया गांधी त्यांच्या हिंदूविरोधी समजुतीमुळे कार्यक्रमाचे राजकारण करीत आहेत. केवळ काँग्रेस पक्ष या कार्यक्रमाचे राजकारण करीत आहे, तर दुसरीकडे भारतीय सभ्यतेचा विजय म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे. सर्वजण जातील, रामललाचे दर्शन घेऊन परत येतील. कोणी राजकीय विधाने करेल किंवा काँग्रेसविरोधी भाषणे देईल, असे मला वाटत नाही. लोकांसाठी हा भारतीय सभ्यतेचा विजय आहे.
वास्तविक, नागालॅण्डची राजधानी कोहिमा येथे ‘भारत जोडो न्याय यात्रे’संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. येथे राहुल यांना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेबाबत प्रश्न विचारण्यात आला, ज्याच्या उत्तरात ते म्हणाले, संघ आणि भाजपाने २२ जानेवारीच्या कार्यक्रमाला नरेंद्र मोदींचे राजकीय कार्यक्रम बनवले आहे. हा संघ-भाजपाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळेच काँग्रेस अध्यक्षांनी या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे सांगितले. आम्ही सर्व धर्मांचा, सर्व प्रथांचा आदर करतो.