किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– रामललाच्या दर्शनाला प्रचंड गर्दी,
अयोध्या, (२३ जानेवारी) – अयोध्या राम मंदिरात होणारी प्रचंड गर्दी पाहता अयोध्येला जाणार्या यूपी रोडवेजच्या सर्व बसेस थांबवण्यात आल्या आहेत. परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक ऑपरेशन मनोज पुंडीर यांनी सांगितले की, अयोध्येला जाणार्या सर्व मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे. गर्दी कमी झाल्यावर त्याचा आढावा घेतला जाईल. अयोध्येतील मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते चार ते पाच किलोमीटर आधीच बंद करण्यात आले आहेत. या मार्गावरून फक्त पादचार्यांनाच जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रचंड गर्दी पाहता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सकाळपासूनच मंदिराबाहेर मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे प्रशासनासमोर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक ऑपरेशन मनोज पुंडीर यांनी सांगितले की, अयोध्येला जाणार्या सर्व मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे.
लखनौच्या जिल्हा दंडाधिकार्यांनी सध्या कोणत्याही प्रवाशांना अयोध्येला पाठवू नये, असे निर्देश दिले आहेत. वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात अडचण येत आहे. त्याऐवजी इथून लोकांना इतरत्र पाठवण्याची व्यवस्था करावी. कृपया अयोध्येतील सेवा दोन तासांसाठी बंद ठेवा. अयोध्येपलीकडे प्रवाशांना कोणतेही बंधन नाही. सर्व क्षेत्र अनुपालन सुनिश्चित करा असे सांगण्यात आले आहे. अयोध्येतील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात अडचण निर्माण झाल्याने परिवहन महामंडळाची कोणतीही बस सध्या अयोध्येला जाऊ शकणार नाही, असे निर्देश बाराबंकीच्या जिल्हा दंडाधिकार्यांनी दिले आहेत. लखनौ ते गोरखपूर मार्गावर जाणार्या बसेस रामनगर-गोंडा मार्गे चालवाव्यात असे आदेश आहेत.
मुख्यमंत्री योगी अयोध्येत पोहोचले
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येत पोहोचले आहेत. मुख्यमंत्री योगी येथील व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. त्यांचे हेलिकॉप्टर रामकथा हेलिपॅडवर उतरले. यावेळी सरकारचे उच्च अधिकारीही अयोध्येत उपस्थित आहेत. अभिषेक झाल्यानंतर पहिल्याच दिवशी अयोध्येत भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.
अडीच ते तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दुसर्या दिवशी मंगळवारी सुमारे २.५ लाख ते ३ लाख भाविकांनी अयोध्येतील रामललाचे दर्शन घेतले आणि तितक्याच संख्येने भाविक दर्शनासाठी थांबले आहेत. भाविकांना सतत दर्शन घेता यावे यासाठी स्थानिक प्रशासनाकडून सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.