किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– जगन मोहन रेड्डी यांना मोठा झटका!,
अमरावती, (२३ जानेवारी) – आगामी निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाला (वायएसआरसीपी) आणखी एक धक्का बसला असून, नरसरावपेटचे खासदार लवू श्रीकृष्ण देवरायालू यांनी मंगळवारी पक्षाचा तसेच संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षातील अलीकडच्या घडामोडी लक्षात घेऊन वायएसआरसीपीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी जाहीर केले. देवरायालू म्हणाले की, वायएसआरसीपीमध्ये अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आपण त्यास जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले. आगामी निवडणुकीत पक्ष दुसर्या नेत्याला उमेदवारी देण्याच्या विचारात आहे, असेही ते म्हणाले. गेल्या निवडणुकीत आपण प्रचंड बहुमताने निवडून आल्याची आठवण करून देत मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला.
गेल्या १५ दिवसांत पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा करणारे ते सत्ताधारी पक्षाचे तिसरे खासदार आहेत. ते तेलगू देसम पक्षात (टीडीपी) प्रवेश करण्याची शक्यता आहे. यापूर्वी कुर्नूलचे खासदार संजीव कुमार आणि मछलीपट्टणमचे खासदार वल्लभनेनी बालशोरी यांनी पक्ष सोडला होता. अभिनयातून राजकारणात आलेल्या पवन कल्याणच्या जनसेना पक्षात प्रवेश करण्याची घोषणा बालशोरी यांनी केली आहे. वायएसआरसीपीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी संसद आणि विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी बदलल्यानंतर सत्ताधारी पक्षात राजीनाम्यांची मालिका सुरू झाली आहे. एप्रिल-मे महिन्यात आंध्र प्रदेशात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. वायएसआरसीपीने २०१९ मध्ये १७५ सदस्यीय विधानसभेत १५१ आणि लोकसभेच्या २५ जागांपैकी २२ जागा मिळवल्या होत्या.