किमान तापमान : 24.09° से.
कमाल तापमान : 24.29° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 4.06 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.09° से.
23.93°से. - 28.21°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.88°से. - 28.16°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.85°से. - 28.29°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.36°से. - 26.86°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.11°से. - 27.74°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.04°से. - 26.29°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, (१४ फेब्रुवारी ) – देशभरात दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचणे आणि तरणांची भरती केल्याबद्दल दिल्ली न्यायालयाने मंगळवारी भारतीय उपखंडातील अल-कायदाच्या (एक्यूआयएस) चार दहशतवाद्यांना सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश संजय खनागवाल यांनी मौलाना मोहम्मद अब्दुल रहमान कासमी, मोहम्मद आसिफ, जफर मसूद आणि अब्दुल सामी यांना सात वर्षे आणि पाच महिन्यांची शिक्षा सुनावली, असे त्यांचे वकील अक्रम खान यांनी सांगितले.
वकिलाने सांगितले की, दोषींनी आधीच सात वर्षे आणि तीन महिने तुरुंगवास भोगला आहे. तो कालावधी शिक्षेचा भाग मानला जाईल. फिर्यादीने सिद्ध केलेल्या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा आहे. न्यायाधीशांनी चौघांना दोषी ठरवले असतानाच दोन कथित एक्यूआयएस ऑपरेटर्स सय्यद मोहम्मद झिशान अली आणि सबील अहमद यांची निर्दोष सुटका केली. फिर्यादी पक्ष त्यांच्याविरोधात आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरला. न्यायालयाने २०१७ मध्ये आरोपींवर आरोप निश्चित केले होते, तर या प्रकरणात आणखी एक आरोपी सय्यद अंजार शाह याला दोषमुक्त केले होते.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आरोप केला होता की, कासमी उत्तरप्रदेशमध्ये एक मदरसा चालवत होता. जिथे अनेक विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती आणि तो विद्यार्थ्यांना दहशतवादी कारवायांसाठी कट्टरपंथी करण्याचा प्रयत्न करीत होता. मसूद तरुणांमध्ये भारतीय उपखंडातील अल् कायदाचा दहशतवादी अजेंडा पसरवत होता आणि त्यांना दहशतवादी संघटनेकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होता, असा दावाही करण्यात आला होता. आसिफला ईशान्य दिल्लीतील सिलमपूर येथून ताब्यात घेण्यात आले, तर कासमीला ओडिशातील कटकच्या जगतपूर भागातून अटक करण्यात आली होती.