किमान तापमान : 23.25° से.
कमाल तापमान : 23.77° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.25° से.
22.99°से. - 28.49°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.46°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.66°से. - 28.57°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.19°से. - 28.07°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल22.54°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल22.51°से. - 26.58°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादलकानपूर, (१४ फेब्रुवारी ) – कानपूर देहाटमध्ये अतिक्रमणाच्या नावाखाली घर पाडण्याच्या कारवाईदरम्यान एका खोलीत स्वतःला कोंडून घेतलेल्या आई-मुलीला जिवंत जाळल्याप्रकरणी आता योगी सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. या प्रकरणी जेसीबीच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी तपासानंतर एसडीएम ज्ञानेश्वर प्रसाद आणि लेखपाल अशोक सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. एकूण ३८ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी या घटनेचा स्थानिक लोकांनी तीव्र निषेध केला. काल अतिक्रमण हटवताना झोपडीला आग लागली. जेसीबीने शेड पाडताना आई-मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
दरम्यान पाच कोटी नुकसान भरपाई, सरकारी नोकरी आणि जमिनीचा पट्टा या मागण्यांसाठी कुटुंबीय व ग्रामस्थांनी मृतदेह उचलू दिला नाही. तर पलीकडच्या लोकांनी गावातून पलायन केले असून झोपडीजवळील शासकीय हातपंप व मंदिर तोडण्याबरोबरच त्यांची झोपडी जेसीबीने पाडण्यात आली. घटनेनंतर अधिकारी घटनास्थळावरून पळून गेले होते. कोसळलेल्या खळ्याला लागलेल्या आगीत आतमध्ये पत्नी प्रमिला दीक्षित (वय ४४ वर्षे) आणि मुलगी नेहा (वय २२ वर्षे) जिवंत जळाल्या. कानपूर देहाटमधील घटनेबद्दल शोक व्यक्त करताना, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही, असे म्हटले आहे. अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. एका खासगी वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, निलंबित करण्यासोबतच दोषींनाही अटक केली जाईल.