किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलविझियानगरम, (३० ऑक्टोबर) – आंध्र प्रदेशातील विझियानगरम येथे रविवारी संध्याकाळी उशिरा झालेल्या या रेल्वे अपघातात १४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुमारे ५० प्रवासी जखमी झाले आहेत, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हावडा-चेन्नई मार्गावर विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर स्पेशल ट्रेनने विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर एक्स्प्रेसला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. कंटकपल्ले आणि अलमांडा रेल्वे स्थानकादरम्यान ही टक्कर झाली, त्यामुळे दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. किमान पाच डबे रुळावरून घसरले. ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ विश्वजित साहू यांनी सांगितले की, ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. काल रात्री १२ वाजेपर्यंत लोकांना वाचवण्याचे काम पूर्ण झाले. ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० जण जखमी झाले आहेत. आज दुपारी ४ वाजेपर्यंत रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
रायगडा जाणार्या ट्रेनने सिग्नल ओलांडल्याने ही टक्कर मानवी चुकांमुळे झाल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. इंग्रजी दैनिक इंडियन एक्स्प्रेसने रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, मागून धडकलेल्या ट्रेनच्या चालकाने कथितरित्या सिग्नल चुकवला आणि लाल सिग्नल ओलांडला. त्यामुळे संथ गतीने जाणार्या लोकल ट्रेनला धडकली. या धडकेमुळे रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले. या भीषण धडकेने गाड्यांचे मोठे नुकसान झाल्याचे घटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये दिसून येते. एक कंपार्टमेंट पूर्णपणे खराब झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये २०० हून अधिक प्रवासी होते. अपघातानंतर आजूबाजूचे लोक आले आणि स्थानिक प्रशासनाची टीम मदत आणि बचावासाठी पोहोचली. वॉलटेर विभागाचे रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांनी परिस्थितीचे गांभीर्य मान्य करताना सांगितले की, मागच्या गाडीने सिग्नल ओलांडल्याने ही धडक झाली आणि समोरील ट्रेनचे तीन डबे आणि मागील ट्रेनचे दोन डबे रुळावरून घसरले. बचाव कार्यात मदत करण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. ईस्ट कोस्ट रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे की, अपघातग्रस्त मदत गाड्या आणि बचाव उपकरणे घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत.
बाधित प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत आणि माहिती मिळावी यासाठी हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आले आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधून अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे अधिकार्यांनी तपास सुरू केला आहे. ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ विश्वजीत साहू यांनी सांगितले की, रेल्वे ट्रॅकची अर्धवट दुरुस्ती करण्यात आली आहे. जखमी प्रवाशांवर विशाखापट्टणम आणि विजयनगरम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पीडितांना मदत जाहीर केली आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये, गंभीर जखमी प्रवाशांना २ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये आणि जखमींना २ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले. पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणाही केली आहे.