किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, २१ सप्टेंबर – कॉंग्रेसने पंजाबमध्ये नेतृत्वबदल केल्यानंतर आता राजस्थानमध्येही नेतृत्वबदलाची चर्चा सुरू झाली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली, तर असंतुष्ट नेते सचिन पायलट यांनी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर या चर्चेला बळ मिळाले आहे.
कॉंग्रेसच्या नेतृत्वाने पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांना राजीनामा देण्याचा आदेश देत, नवे मुख्यमंत्री म्हणून चरणजितसिंग चन्नी यांची निवड केली. पंजाबमधील या घटनाक्रमानंतर राजस्थानमध्ये नेतृत्वबदलाची चर्चा सुरू झाली. अशोक गहलोत यांनी सोनिया गांधींशी दूरध्वनीवर चर्चा केली. या दोघांत काय चर्चा झाली, त्याचा तपशील समजू शकला नाही. सोनिया गांधींना भेटण्यासाठी गहलोत स्वत:च दिल्लीत येणार होते, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नाही. १७ सप्टेंबरला सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेत त्यांच्याशी दोन तास चर्चा केली.
पायलट जवळपास दीड वर्षानंतर राहुल गांधींना भेटले. पक्षसंघटना तसेच मंत्रिमंडळातील फेरबदल तसेच सचिन पायलट यांची भूमिका या मुद्यांवर या दोघांत चर्चा झाल्याचे समजते. यावेळी प्रथमच राहुल गांधी यांनी पायलट यांनी भेटीसाठी वेळ दिला.
पायलट यांनी कॉंग्रेस महासचिव श्रीमती प्रियांका वढेरा तसेच संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांचीही भेट घेतली. वेणुगोपाल तसेच कॉंग्रेसचे राजस्थान प्रभारी अजय माकन मुख्यमंत्री अशोक गेहलोत तसेच सचिन पायलट या दोघांच्या संपर्कात असल्याचे समजते. सचिन पायलट राजस्थान प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष तसेच गेहलोत मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. मात्र काही आमदारांसह बंड केल्यानंतर पायलट यांना या दोन्ही पदावरुन हटवण्यात आले होते.