किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलकर्नाटक विधानसभेत आमदाराने केला मिशनर्यांचा पर्दाफाश,
बंगळुरू, २२ सप्टेंबर – कर्नाटक विधानसभेत मंगळवारी हिंदूंना ख्रिश्चन बनविण्याचा मुद्दा जोरकसपणे उपस्थित झाला. भाजपाचे आमदार गुलीहट्टी शेखर यांनी या मुद्याकडे सभागृहाचे लक्ष वेधताना, ख्रिश्चनांनी आतापर्यंत २० हजारांवर लोकांचे बळजबरीने धर्मांतर केले असल्याचा आरोप केला.
ख्रिश्चन मिशनर्यांकडून हिंदूंचे धर्मांतरण करण्याची व्यापक मोहीमच सुरू आहे. या मिशनर्यांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. जे लोक धर्मांतराचा विरोध करतात, त्यांना खोट्या आरोपांमध्ये अडकविले जाते किंवा त्यांच्या कुटुंबीय सदस्यांवर अत्याचार केले जातात, असे त्यांनी सांगितले. यावेळी सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपा सदस्यांना शांत करताना राज्याचे गृहमंत्री ए. ज्ञानेंद्र यांनी अशा मिशनर्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची ग्वाही सभागृहाला दिली. कोणतेही आमीष दाखवून धर्मपरिवर्तन करणे हा गुन्हाच आहे आणि अशा गुन्ह्यातील आरोपींना कदापि माफ केले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
गुलीहट्टी शेखर म्हणाले की, या मिशनर्यांनी माझ्या आईचेदेखील धर्मांतर केले होते. त्यांना कपाळावर कुंकू लावण्यास मनाई करण्यात आली. तिच्या मनात मिशनर्यांची इतकी भीती निर्माण झाली आहे की, आता ती घरातील देवघराकडेही पाहात नाही. तिच्या फोनचा रिंगटोनही ख्रिश्चन प्रार्थनेसह बदलण्यात आला.
माझी आई आजारी असायची. काही मिशनर्यांनी तिच्याशी संपर्क साधला आणि चर्चमध्ये बोलावले. आमच्या प्रार्थना सभांमध्ये सहभागी राहा, काही दिवसांतच तुमची प्रकृती सुधारेल, असे तिला सांगण्यात आले. आता ती मिशनर्यांच्या पूर्णपणे नियंत्रणात आहे. तिच्या मनात भीतीही आहे. आम्ही तिला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण ती आता आमचेही ऐकत नाही. आत्महत्या करण्याची धमकी देते, अशी माहिती त्यांनी दिली.
जे लोक मिशनर्यांचे ऐकत नाही, त्यांना बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये फसविले जाते. अशा दबाव तंत्राच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत २० हजारांवर लोकांचे धर्मपरिवर्तन केले आहे. अनु. जाती व जमातीमधील गरीब कुटुंब त्यांच्या दबावाला सहजपणे बळी पडतात, असे त्यांनी सांगितले.