किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 31.05° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.05° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश-लॉरेन्स बिश्नोईने कोर्टाला सांगितली आपबीती,
नवी दिल्ली, (२५ फेब्रुवारी ) – देशातील अनेक राज्यांमध्ये गोळ्या झाडून दहशत पसरवणार्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला आता जीवाची भीती वाटू लागली आहे. उद्योगपती, प्रभावशाली आणि सर्वसामान्य लोकांचा जीव मुठीत धरणारा असा हा बदमाश कायद्यापुढे हतबल झाला आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसला आपल्याला मारायचे आहे, अशी याचिका त्यांनी न्यायालयात दाखल केली. लॉरेन्स बिश्नोई यांनी आज राजस्थान न्यायालयात हजेरी लावताना अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून त्यांच्या जीवाला धोका आहे. दोन्ही पक्षांची सरकारे राजकीय शत्रुत्वामुळे आपल्याला खोट्या खटल्यात अडकवत आहेत, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या सरकारकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप लॉरेन्सने केला आहे.
अनेक खून आणि त्याच्या कटात सहभागी असलेल्या लॉरेन्सला आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. सुरक्षेचे कारण पाहता लॉरेन्सची वैद्यकीय तपासणीही पोलिस ठाण्यातच केली जाईल, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. आता जयपूर येथील जयपूरिया हॉस्पिटलचे एक पथक जवाहर सर्कल पोलिस ठाण्यात येऊन लॉरेन्सची वैद्यकीय तपासणी करणार आहे. हजर होण्यापूर्वी लॉरेन्सच्या वकिलाने त्याच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. वकिलाच्या म्हणण्यानुसार, २१ फेब्रुवारीपूर्वी पोलिसांनी लॉरेन्सला त्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी खुल्या जीपमध्ये नेले होते, तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने लॉरेन्सला बुलेट प्रूफ वाहनात आणि कमांडोच्या संरक्षणात नेण्याचे निर्देश दिले आहेत. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा चार वेगवेगळ्या एजन्सींच्या अधिकार्यांशी सामना झाला.