किमान तापमान : 28.76° से.
कमाल तापमान : 29.58° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 5.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.58° से.
27.43°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– योगी आदित्यनाथ अखिलेश यादववर संतापले,
लखनौ, (२५ फेब्रुवारी ) – जे आपल्या वडिलांचा आदर करू शकत नाही, अशांना लाज वाटायला हवी, अशा शब्दांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी उत्तरप्रदेश विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना विरोधकांवर हल्ला चढविला. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान सपा व आरएलडी आमदारांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांना सडेतोड उत्तर दिले. ज्याला मातृशक्तीचा आदर करता आला नाही, तो राज्यातील निम्म्या लोकसंख्येचा आदर कसा करणार, राज्यपाल हे मातृशक्तीचे प्रतीक आहे, त्या घटनात्मक प्रमुख आहेत. त्यांच्या शब्दांचा आदर करायला हवा होता. एका महिलेचा निषेध, असंसदीय, असभ्य भाषा, घोषणाबाजी हे खेदजनक होते, असेही मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले.
यावेळी आदित्यनाथ यांनी मुलायमसिंह यादव यांच्या कार्यकाळात माजी मुख्यमंत्री मायावतींसोबत विश्रामगृहात झालेल्या घटनेचाही उल्लेख केला. त्यावेळी ‘मुलं मुलेच असताच, त्यांच्याकडून चुका होतात’ असे विधान समोर आले होते आणि आता हे लोक लोकशाहीबद्दल आणि कायदा-सुव्यवस्थेबद्दल बोलतात, ही आश्चर्याची बाब आहे, अशा शब्दांत आदित्यनाथांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. राज्यातील जनतेला दोष देऊ नका, तुम्हाला तुमच्या वडिलांचा आदर करता आला नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
चिन्मयानंदच्या उल्लेखाने योगी संतापले
अखिलेश यादव यांनी बलात्काराचा आरोपी चिन्मयानंदचा उल्लेख करीत म्हटले की, हेही सांगा की, चिन्मयानंदचे गुरू कोण आहेत? तुम्हाला लाज वाटायला हवी… हे ऐकून मुख्यमंत्री योगी संतापले आणि अखिलेशकडे बघून म्हणाले, तुला लाज वाटली पाहिजे, ज्याला स्वत:चाही आदर करता येत नाही. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली. हे बघून सपा व भाजपाच्या आमदारांनी गदारोळ सुरू केला.
प्रयागराजमधील उमेश पाल हत्या प्रकरण
प्रयागराजच्या प्रसिद्ध राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पाल आणि त्याचा सुरक्षा रक्षक संदीप निषाद यांची शुक‘वारी संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी उमेश पालच्या पत्नीने बाहुबली अतिक अहमदच्या कुटुंबाविरुद्ध धुमनगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राजू पाल हे बहुजन समाज पक्षाचे आमदार होते आणि त्यांची हत्या २००५ मध्ये झाली होती. उमेश पाल हा त्या खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार होता. राजू पाल हत्येतील मुख्य आरोपी माफिया अतिक अहमद हा गुजरातच्या कारागृहात आहे.