किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादललखनौ, (२९ ऑक्टोबर) – आमच्या सरकारने जात, कुटुंब, प्रदेश किंवा भाषेवर आधारित सामाजिक विभाजन करण्याचे पाप केलेले नाही, असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी सांगितले. औरैया येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. कुटुंब आधारित राजकारणाला चालना देणारे लोक जातीवादाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला विकासापासून वंचित ठेवत आहेत. जात, कुटुंब, प्रदेश किंवा भाषेच्या आधारे समाजात फूट पाडण्याचे पाप आम्ही केलेले नाही, याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला.
राज्यात विजयादशमीच्या वेळी सर्व कार्यक्रम शांततेत पार पडले, असे योगी सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. ते म्हणाले, २०१७ पूर्वी सणांमुळे भीती निर्माण होत असे. परंतु, गत साडेसहा वर्षांनंतर ते उत्साहाने साजरे केले जात आहेत. उत्तरप्रदेशात महिलांच्या उत्थानासाठी सरकारतर्फे विविध प्रकल्प जोरात राबविण्यात येत असून, याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
कोणताही समाज तोपर्यंत स्वावलंबी आणि सशक्त होऊ शकत नाही, जोपर्यंत निम्मी लोकसंख्या सुरक्षित आणि प्रतिष्ठित जीवन जगत नाही. हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी नवीन संसदेचे पहिले अधिवेशन नारी शक्तीला सर्वोच्च प्राधान्य दिले. ‘वंदन कायद्यानुसार’ विधानसभा आणि लोकसभेत महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवल्या जातील, असे ते म्हणाले. आमच्या सरकारने मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेतील रक्कम पुढील आर्थिक वर्षापासून १५,००० रुपयांवरून वाढवून २५,००० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम मुलीच्या जन्मापासून तिच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी दिली जाते, असे आदित्यनाथ यांनी सांगितले.