किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून ३५ लोक जखमी,
– गुप्तचर विभागाचाही होता अलर्ट,
कोच्चि, (२९ ऑक्टोबर) – केरळच्या एर्नाकुलम येथील एका प्रार्थना सभेमध्ये एकापाठोपाठ पाच स्फोट झाले आहेत. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून ३५ लोक जखमी झाले आहेत. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. कन्व्हेंशन सेंटरमध्ये स्फोट झाला तेव्हा तिथे २ हजार लोक उपस्थित होते असे सांगितले जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून संपूर्ण केरळ हादरून गेले आहे. स्फोटानंतर एनआयएची टीम घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी बोलून कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच एनआयए आणि एनएसजीला घटनास्थळी पोहोचून घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले.
दरम्यान , प्राथमिक अंदाजानुसार हा दहशतवादी हल्ला आहे. बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. थ्रिक्काकारा सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) बेबी पीव्ही यांनी पुष्टी दिली की या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे आणि २०-२५ जण जखमी झाले आहेत. त्यांनी सांगितले की, ५-१० सेकंदात दोन स्फोट झाले. केरळ स्फोटानंतर या स्फोटाचं थेट कनेक्शन हमास आणि इस्रायलच्या युद्धाशी लावले जात आहे. इस्लामिक कट्टरपंथीयांवर या हल्ल्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
इस्रायल आणि हमास युद्धा दरम्यान एक अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यात भारतातील ज्यूंशी संबंधित स्थळांना अतिरेक्यांकडून धोका असल्याचं सांगितलं गेलं होतं. एवढेच नव्हे तर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने इसिसच्या दोन अतिरेक्यांना अटक केली होती. त्यांनी धक्कादायक माहिती दिली होती. मुंबईच्या चावर्ड हाऊसमधील ज्यूंच्या एका महत्त्वाच्या स्थळाची बेकायदेशीरपणे रेकी करून त्याचा व्हिडीओ विदेशातील दहशतवाद्यांना पाठवल्याचं या दोघांनी म्हटलं होतं.
मध्य प्रदेशातील रतलाममध्ये अल सुफा या दहशतवादी संघटनेचं नेटवर्क असल्याचा खुलासा सुरक्षा एजन्सीने केला होता. त्या अतिरेक्यांच्या स्थळावर भारतातील ज्यूंची स्थळे होती. दरम्यान, केरळमधील ब्लास्टमागे हमास असण्याची चर्चा असली तरी त्याबाबतचा कोणताच खुलासा झालेला नाही. कोणीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
एनआयएकडून तपास सुरू
एनआयएकडून या स्फोटाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्रार्थना सभेतील स्फोटाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या सभेला दोन हजार लोक उपस्थित होते. खुर्च्यांवर बसून प्रार्थना करत होते. अचानक हॉलच्या मधोमध बॉम्ब स्फोट झाले. प्रत्यक्षदर्शींच्या मते पाच स्फोट झाले. त्यामुळे अचानक धूर पसरला. खुर्च्यांना आग लागली. त्यामुळे लोक भयभीत झाले आणि किंचाळतच हॉलमधून बाहेर पडण्यासाठी धावपळ करत होते. या धावपळीत अनेकजण पडले. अनेकांना गंभीर मार लागला. जळणार्या खुर्च्या, पळणारी लोकं आणि विव्हळणारी मुलं, आक्रोश आणि किंचाळ्या असे चित्र या व्हिडिओतून दिसत आहे.