किमान तापमान : 24.28° से.
कमाल तापमान : 24.86° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 66 %
वायू वेग : 2.52 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.28° से.
23.99°से. - 27.79°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 28.46°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल25.09°से. - 28.76°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.94°से. - 28.38°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.26°से. - 28.45°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.39°से. - 27.44°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल– बिहारच्या आकडेवारीनंतर आसाम सरकारचा निर्णय,
गुवाहाटी, (०५ ऑक्टोबर) – आसाम राज्यातील पाच मूळ आदिवासी मुस्लिम समाजाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचे राज्य सरकारने अलिकडेच सांगितले. यामुळे या समाजाच्या विकासासाठी पावले उचलता येतील. मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्री कार्यालयाने समाज माध्यमावर लिहिले की, जनता भवनमध्ये एका बैठकीदरम्यान मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी संबंधित अधिकार्यांना आसामच्या मूळ आदिवासी मुस्लिम समाजाच्या (गोरिया, मोरिया, देशी, सय्यद आणि जोल्हा) सामाजिक-आर्थिक स्थितीचा आढावा घेण्याचा निर्देश दिला आहे. या आढाव्यानुसार मूळ आदिवासी अल्पसंख्यकांच्या व्यापक सामाजिक-राजकीय आणि शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने पाऊल उचलण्यासाठी राज्य सरकार मार्गदर्शन करेल.
आसाम सरकारने जवळपास आठ महिन्यांनंतर राज्यात बालविवाहाविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा म्हणाले होते की, भाजपाला बालविवाह आणि बहुविवाहसारख्या कुप्रथात अडकलेल्या मुस्लिम लोकांच्या मतांची गरज नाही. त्यांनी सांगितले की, राज्यात नव्याने बालविवाहाविरुद्ध अभियान सुरू झाले आहे. आतापर्यंत १०४० लोकांना या प्रकरणात अटक करण्यात आली. पहिल्या टप्प्यात राज्यात सुमारे तीन हजार लोकांना अटक केली होती. सहा हजारांहून जास्त लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.
२०११च्या जनगणनेनुसार, मुस्लिमांची एकूण संख्या १.०६ कोटी होती. ही एकूण लोकसंख्येच्या ३४.२२ टक्के होती. सध्या यात वाढ होऊन ४० टक्क्यांपेक्षाही जास्त होण्याचा अंदाज आहे. आसामची लोकसंख्या सुमारे ३.५० कोटी आहे. यात १.४० कोटी मुस्लिम आहेत. जम्मू-काश्मीरनंतर आसाम एकूण लोकसंख्येत मुस्लिम हिस्सेदारीच्या हिशोबाने दुसरे मोठे राज्य आहे. आसाममध्ये इस्लाम दुसरा सर्वांत मोठा धर्म आणि सर्वांत वेगाने वाढणारा धर्म आहे. यात वेगाने वाढणार्या खाजगी मदरशांची महत्त्वाची भूमिका आहे.