किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-पत्नीलाही सुनावणीसाठी पाचारण,
नवी दिल्ली, (०४ ऑक्टोबर) – ईडीने तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच खासदार अभिषेक बॅनर्जी यांना नोटीस पाठवत ९ ऑक्टोबरला सुनावणीसाठी बोलाविले आहे. याशिवाय त्यांची पत्नी रुजिरा यांनाही ११ ऑक्टोबरला उपस्थित राहण्याचा आदेश दिला आहे. माहितीनुसार, ईडीने खासदार अभिषेक बॅनर्जी यांना ३ ऑक्टोबरला शालेय भरती घोटाळा प्रकरणासंबंधी चौकशीसाठी कोलकाता येथील ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले होते. परंतु, आपण राजधानी दिल्लीत असल्याने कोलकात्यात चौकशीसाठी येऊ शकणार नसल्याचे त्यांनी अधिकार्यांना कळविले. त्यामुळे त्यांना ९ ऑक्टोबरला उपस्थित राहण्यास नोटिशीद्वारे बजावण्यात आले. याशिवाय त्यांच्या पत्नीलाही सुनावणीसाठी ११ ऑक्टोबरला उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली.
२०१४ मधील घोटाळा
तृणमूल काँग्रेसचे तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या कार्यकाळात पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आला होता. पश्चिम बंगाल शालेय सेवा आयोगाने सरकारी शाळांसाठी शिक्षकांची भरती सुरू केली होती. मात्र, या प्रकि‘येत अनेक चुका झाल्याच्या तक‘ारी कलकत्ता हायकोर्टात करण्यात आल्या होत्या. काही उमेदवारांना परीक्षेत कमी गुण मिळूनही त्यांना गुणवत्ताप्राप्त धारकांच्या यादीत स्थान दिले होते. काहींना तर पात्र नसतानाही नोकरी देण्यात आली. कळस म्हणजे, ज्या उमेदवारांनी टीईटी परीक्षा उत्तीर्णच केली नाही, अशांनाही शिक्षकाच्या नोकरीसाठी पात्र ठरविल्याचे तपासात दिसून आले.