किमान तापमान : 26.17° से.
कमाल तापमान : 26.72° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 2.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.72° से.
23.68°से. - 28.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल24.11°से. - 28.99°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.75°से. - 28.8°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.78°से. - 28.5°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर कुछ बादल25.03°से. - 28.91°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.82°से. - 29.26°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल-छत्तीसगडमध्ये मोदींचा हल्लाबोल,
जगदलपूर, (०३ ऑक्टोबर) – ज्या समाजाची जितकी लोकसंख्या, संसाधनांवर त्यांचा तितकाच जास्त हक्क, असा सूर काँग्रेस पक्ष विशेषत: या पक्षाचे खासदार राहुल गांधी काढत आहेत. मला त्यांना इतकेच विचारायचे आहे की, या देशात सर्वाधिक लोकसंख्या हिंदूंची आहे, मग हिंदूंना सर्व हक्क देऊन टाकायचे का? अशी विधाने करून काँग्रेस देश विभाजित करण्याचा कट रचत असल्याचे वाटते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेसवर हल्ला चढविला.
या देशात सर्वाधिक लोकसंख्या गरिबांची आहे आणि माझे सरकार गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत काम करीत आहे. काँग्रेस पक्ष लोकसंख्येच्या आधारावर अधिकारांचे वाटप करण्याच्या गोष्टी करीत आहे. हिंदूंना विभाजित करून देशाचे विभाजन करण्याचा या पक्षाचा प्रयत्न आहे, असा आरोप मोदी यांनी छत्तीसगडच्या जगदलपूर येथे भाजपाच्या परिवर्तन महासंकल्प रॅलीला संबोधित करताना केला.
संपुआचे सरकार असताना तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी देशातील संसाधनांवर पहिला हक्क अल्पसं‘यकांचा विशेषत: मुस्लिमांचा असल्याचे वक्तव्य केले होते. आता काँग्रेस म्हणत आहे की, ज्यांची लोकसंख्या जास्त, त्यांचा संसाधनांवर तेवढाच अधिकार असायला हवा. म्हणजे, आता काँग्रेसला अल्पसं‘यकांचा अधिकार कमी करायचा आहे का, काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी. काँग्रेसची भूमिका मान्य केली तर काय आता सर्व अधिकार सर्वाधिक लोकसं‘या असलेल्या हिंदूंना द्यायला हवेत का, असा सवाल मोदी यांनी विचारला.