किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलदिसपूर, (१८ मार्च) – ईशान्येकडील आसाम राज्याला आज शनिवारी सलग दोन भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.६ आणि २.८ मोजण्यात आली. दोन्ही भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. रिश्टर स्केलवर ३.६ तीव्रतेचा पहिला भूकंप सकाळी ९.०३ वाजता ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिण तीरावर जोरहाट जिल्ह्यातील टिटाबरजवळ ५० किमी खोलीवर केंद्रबिंदूसह नोंदवला गेला, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले. शेजारच्या शिवसागर, कार्बी आंगलांग आणि गोलाघाट जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के जाणवले. ब्रह्मपुत्रेच्या उत्तरेकडील लखीमपूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. नागालँडच्या वायव्य भागातही अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचे म्हटले आहे.
दुसरा भूकंप सकाळी ११.०२ वाजता जाणवला. ब्रह्मपुत्रेच्या उत्तर तीरावरील दररंग जिल्ह्यातील दलगावजवळ नऊ किमी खोलीवर त्याचा केंद्रबिंदू असलेल्या त्याची तीव्रता २.८ रिश्टर स्केलवर मोजण्यात आली. उदलगुरी, बक्सा आणि सोनितपूर जिल्ह्यात राहणार्या लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले, तर शक्तिशाली नदीच्या दक्षिणेकडील मोरीगावमधील लोकांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. ईशान्य प्रदेश हा उच्च भूकंपाच्या क्षेत्रात येतो, या प्रदेशात भूकंप वारंवार होतात.