किमान तापमान : 28.5° से.
कमाल तापमान : 28.83° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 2.86 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.83° से.
27.34°से. - 30.71°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.15°से. - 29.76°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.65°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.1°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.59°से. - 30.7°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 30.37°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश-रस्त्यांवर करावे लागते वास्तव्य, अनेकांची उपासमार,
गुवाहाटी, (२८ ऑगस्ट) – आसाम राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळत असून, ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे गंभीर पूरस्थिती दिसून येत आहे. दिब्रुगडमध्ये ब्रह्मपुत्रेने धोक्याची पातळी पार केली आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानुसार, महापुरामुळे सहा जिल्ह्यांमध्ये ५३ हजारांपेक्षा अधिक नागरिक पूरग्रस्त भागात अडकलेले आहेत. खोलगट भागात वास्तव्यास असलेल्या अनेकांना राहती घरे सोडून सुरक्षित जागी आसरा घ्यावा लागला असून, रस्त्यांवर सुद्धा वास्तव्य करावे लागत आहे.
ब्रह्मपुत्रा नदी राज्याच्या अनेक भागातून धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. जोरहाट जिल्ह्यातील धुबरी आणि नेमाटीघाट येथे, बेकी नदी ही बारपेटा जिल्ह्यात रोड बि‘जवर, दिखो नदी शिवसागर येथे, तर संकोश नदी धुबरी जिल्ह्यात गोलकगंजमध्ये धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.
एक लाख नागरिक आश्रयाविना
आसाम राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये तब्बल एक लाख लोकांना घराशिवाय राहावे लागत आहे. या सर्वांची उपासमार होत असल्याचेही आढळून आले आहे. गोलाघाट जिल्ह्यात सर्वांत जास्त २९ हजार लोकांना घर सोडावे लागले असून, धेमाजीमध्ये २८ हजार आणि शिवसागर जिल्ह्यात १३ हजार ५०० लोकांना अन्यत्र आसरा घ्यावा लागला आहे. सध्या दोन जिल्ह्यांत १७ निवारा शिबिरांतून २ हजार ९४१ लोकांनी आश्रय घेतला आहे.