किमान तापमान : 28.76° से.
कमाल तापमान : 29.58° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 5.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.58° से.
27.43°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– सिलेंडर ४५० रुपयांत,
– राखी सणासाठी १२५० रुपये,
– पोलिस, शिक्षक भरतीत वाढीव आरक्षण,
भोपाळ, (२७ ऑगस्ट) – मध्यप्रदेश सरकारच्या लाडली बहना योजनेंतर्गत मु‘यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींसाठी भेटवस्तूंचा खजिना उघडला आहे. याविषयी महिलांनी आनंद व्यक्त केला आहे. आपल्या सरकारच्या लाडली बहना योजनेंतर्गत आयोजित एका परिषदेत शिवराजसिंह चौहान यांनी रविवारी श्रावण महिन्यात स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर केवळ ४५० रुपयांना मिळणार असल्याची घोषणा केली. एवढेच नाही तर, रक्षाबंधन सणाच्या पृष्ठभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महिलांना दरमहा मिळणारी रक्कम १२५० रुपये केली आहे. म्हणजेच या महिन्यात केवळ लाडली बहन योजनेचा लाभ घेणार्या महिलांना १००० रुपयांऐवजी १२५० रुपये मिळणार आहेत.
लाडली बहना संमेलनात शिवराजसिंह म्हणाले की, राज्यातील नशेची प्रवृत्ती रोखण्यासाठी पुढील वर्षीपासून नवीन मद्य धोरण तयार केले जाईल. बहिणींना नको असलेली दारूची दुकाने उघडणार नाहीत. आरक्षणाबाबत मोठी घोषणा करताना मुख्यमंत्री म्हणाले की, आतापर्यंत महिलांना पोलिस खात्यात ३० टक्के आरक्षण मिळायचे. आता ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. शिक्षक भरतीत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहे. मध्यप्रदेशात मुलींना शिक्षण घेता यावे म्हणून लाडक्या बहिणींच्या मुलींच्या शाळेचे शुल्क सरकार भरणार आहे.
ते म्हणाले की, ज्या भगिनींकडे राहण्यासाठी जमीन नाही. त्यांना गावात मोफत भूखंड देण्यात येणार असून, शहरातील माफियांकडून मोकळ्या झालेल्या जमिनीवर घर बांधून त्यांच्या नावावर रजिस्ट्री करण्यात येणार आहे. वाढीव वीजबिल वसूल होणार नाही. सप्टेंबरमध्ये वाढलेली बिले शून्यावर आणली जातील. गरीब भगिनींचे वीज बिल महिन्याला फक्त १०० रुपये येते, त्याचीही व्यवस्था केली जाईल. यासाठी ९०० कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात आली असून, त्याद्वारे प्रत्येक घरात वीज पोहोचवली जाईल.