किमान तापमान : 26.6° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादल– मुख्यमंत्र्यांच्या वडिलोपार्जित घरावर हल्ल्याचा प्रयत्न,
इम्फाळ, (२९ सप्टेंबर) – मागील पाच महिन्यांपासून वांशिक हिंसाचाराने ग्रस्त इम्फाळ अजूनही शांत झालेले नाही. थिथे पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. २८ सप्टेंबर रोजी जमावाने मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित रिकाम्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा दलांनी जमावाला पांगवले. पोलिसांनी सांगितले की, इम्फाळमधील हिंगांग भागात मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या कुटुंबीयांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरक्षा दलांनी जमावाला घरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर रोखले. या घराभोवती कडक सुरक्षा असली तरी, आता घरात कोणीही राहत नाही.
जुलैपासून बेपत्ता असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे सोमवारी २५ सप्टेंबर रोजी फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर मणिपूरमध्ये पुन्हा तणाव पसरला. दोन तरुणांच्या मृत्यूप्रकरणी विद्यार्थ्यांनी हिंसक निदर्शने केली. आश्चर्याची बाब म्हणजे, हिंसाचार उसळलेल्या भागांत ‘शांतता’ असल्याचे मणिपूर सरकारने घोषित केले आहे. जमावाने इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील उपायुक्त कार्यालयाची तोडफोड केली आणि दोन चारचाकी गाड्या पेटवून दिल्या. २८ सप्टेंबरला पहाटे ही घटना घडली. निदर्शनादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. यानंतर जमावाने पोलिसांच्या गाड्या जाळल्या. दरम्यान, हिंसाचार उसळल्याने मणिपूरमध्ये १ ऑक्टोबरपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
जमावाकडून जाळपोळीचा प्रयत्न
याआधी बुधवारी आंदोलकांनी थोबुल जिल्ह्यातील भाजपा कार्यालयाला आग लावली होती. दुसरीकडे, इम्फाळमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष शारदा देवी यांच्या घरावरही हल्ला करण्यात आला. याशिवाय इम्फाळ पश्चिम येथील उपजिल्हाधिकार्यांच्या घराची जाळपोळ करण्याचाही प्रयत्न झाला.