किमान तापमान : 26.96° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 5.33 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
23.94°से. - 29.99°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.38°से. - 28.63°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.28°से. - 29.45°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.43°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.15°से. - 28.01°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.72°से. - 27.96°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादल– अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण,
भोपाळ, (२९ सप्टेंबर) – उज्जैन येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला कठोर शिक्षा होईल, याची खात्री आपले सरकार देते, अशी ग्वाही मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. गणेशोत्सवादरम्यान आपल्या शासकीय निवासस्थानी स्थापन करण्यात आलेल्या गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते.
या घटनेतील भरत नावाच्या आरोपीला पकडताना त्याला दुखापत झाली आहे. मी प्रत्येक तासाला या प्रकरणाचा आढावा घेत आहे. अशा नराधमांना सभ्य समाजात स्थान नसते. आरोपीने मध्यप्रदेशच्या सदसद्विवेकबुद्धीला घायाळ केले आहे, असे मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितले. पीडित मुलगी मध्यप्रदेशची आहे. आम्ही तिची सर्व प्रकारे काळजी घेऊ. ती माझी मुलगी आहे तसेच राज्याचीही मुलगी आहे आणि आम्ही आरोपींना कठोर शिक्षा होईल, याची खात्री करू, असेही चौहान म्हणाले.
मध्यप्रदेशच्या उज्जैन शहर पोलिसांनी गुरुवारी भरत सोनी या ऑटोरिक्षा चालकाला अटक केली. त्याच्यावर तीन दिवसांपूर्वी शहरातील रस्त्यावर जखमी अवस्थेत फिरताना आढळलेल्या सुमारे १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. इंदूरच्या रुग्णालयात दाखल असलेल्या मुलीची प्रकृती हळूहळू सुधारत आहे, असे रुग्णालयाला भेट दिलेल्या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्याने सांगितले.
पोलिसांमधील सहृदयता
दरम्यान, दोन पोलिसांनी या मुलीसाठी रक्तदान केले तर, एका पोलिसाने पीडित मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. महाकाल पोलिस स्टेशनचे निरीक्षक अजय वर्मा यांनी पीडित मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. ते म्हणाले की, पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा शोध लागला आहे. त्यामुळे कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेत न अडकता मी त्यांना मदत करू शकतो. मी तिच्या आर्थिक गरजा, शिक्षण आणि आरोग्याची काळजी घेऊ शकतो. मला तिचे पालक सापडले नसते तर, मी तिला कायदेशीररीत्या दत्तक घेतले असते.